चंद्रपूर / प्रवीण गोंगले /--

विकासाचा पहिला मानबिंदू म्हणजे शेतीला पाणी देणे आहे. शेतीला पाणी देणे आपले प्राधान्य राहणार असून या पाच गावांसाठी 27 कोटी रुपयांची योजना तयार होत असून येत्या चार महिण्यात शेतीला पाणी मिळणारच असा ठाम विस्वास पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. चिंचाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
चिंचाळा व उथलपेठ जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. आयटीसी कंपनीच्या वतीने उद्योजकता सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीमधून बसविण्यात आलेल्या या मशिनमधून एटीम प्रमाणे पाणी पुरवठा होतो. पाच रुपयांचा कॉइन टाकल्यास एक वेळा मशीन मधून 20 लिटर पाणी मिळते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, सभापती देवराव भोंगळे, पंचायत समिती सभापती संगीता पेंदाम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिप सदस्यता वर्षा परचाके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, सरपंच सुषमा सिडाम, मॅक्स ॲक्वा आशिष कटारिया, रवी कंडारा, प्रकाश दालमिया, आयटीसीचे आशिष पॉल यावेळी उपस्थित होते.आदर्श गाव करण्यासाठी नियोजन केले आहे. गावाचे रस्ते होतील, नाल्या होतील, शाळा आदर्श होईल. हे गाव इतरांनी येऊन पहावे असेच आदर्श होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
8 दिवसात याच ठिकाणी थंड पाणी देण्याची सोय केली जाईल असे ते म्हणाले. या गावच्या 27 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेला जलसंपदा मंत्री यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. मूल तालुक्यातील प्रत्येक गावाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. नागरिकांनी हे जलशुद्धीकरण केंद्र आपले समजून वापरावे व केंद्राच्या देखभालीची जबाबदारी घ्यावी असे ते म्हणाले. चिखलीमध्ये 97 लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याचे ते म्हणाले. शुद्ध पाण्यासाठी केवळ पाचच रुपये द्यावे लागणार आहेत ते नियमित द्या व आपले आरोग्य योग्य ठेवा असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा संध्याताई गुरुनुले म्हणाल्या की, आमदार आदर्श गावाचा प्रश्न या जलशुद्धीकरण केंद्रामुळे सुटला आहे. आता गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. या गावातील विविध समस्या निकाली निघणार आहेत. जिल्हा परिषदने या गावात विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. पाणी पुरवठा योजणेअंतर्गत निधी देण्यात येईल असे त्या म्हणाल्या. रस्ताची कामे सुद्धा केल्या जातील. येत्या तीन वर्षात टप्प्या टप्प्याने या भागाचा विकास होणार आहे. अंगणवाडी स्मार्ट केल्या जाईल असे त्या म्हणाल्या. या गावाला 8 वा वर्ग देण्याची मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उथळपेठ येथेही पालकमंत्री यांच्या हस्ते जलशुध्दीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. आयटीसी कंपनीच्या सीएसआर निधीतून हे जलशुध्दीकरणकेंद्र निर्माण करण्यात आले आहे.

Post a Comment