नागपूर : --

लाचखोर पोलीस हवालदाराला भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी गिट्टीखदानमध्ये जेरबंद केले. राजेंद्र निंबाळकर (वय ४६) असे आरोपीचे नाव आहे. तो गिट्टीखदान पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
जरीपटक्यातील विपीन श्री राजेंद्र शेंडे (वय ३२) हे वाहतूकदार आहेत. त्यांची मालवाहू बोलेरो गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच विविध प्रकारचे साहित्य ने-आण करते. आरोपी हवालदार निंबाळकरने ते हेरले. काही दिवसांपूर्वी त्याने शेंडेचे मालवाहू वाहन पकडले. कारवाईचा धाक दाखवला. यापुढे गिट्टीखदान परिसरात वाहन चालवायचे असेल तर महिन्याला २ हजार रुपये ‘एन्ट्री फी’ द्यावी लागेल, असे बजावले. शेंडेने सरळ एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली. एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांनी तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शेंडे लाचेची रक्कम घेऊन आज सायंकाळी हवालदार निंबाळकरकडे गेले. १५00 रुपयात लाचेचा सौदा पक्का केल्यानंतर निंबाळकरच्या हातात शेंडेने लाचेची रक्कम ठेवली. ती स्वीकारताच एसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप कुंदोजवार आणि त्यांच्या सहकार्यांनी निंबाळकरच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याविरुद्ध तो कार्यरत असलेल्या गिट्टीखदान ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment