BREAKING NEWS

Friday, May 27, 2016

बिलासपूरसाठी आता दररोज सुपरफास्ट ट्रेन

गोंदिया :

 

 उन्हाळ्याच्या दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी व प्रवाशांची होणारी प्रचंड असुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाद्वारे गोंदिया व बिलासपूर या दोन अति महत्वाचा स्टेशन दरम्यान  ८ ते ३0 जूनपर्यंत सात फेर्‍यांसाठी स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे.
गोंदिया ते बिलासपूरसाठी प्रत्येक बुधवार व शनिवारी (0८२९७) या क्रमांकाने व बिलासपूर ते गोंदियासाठी प्रत्येक गुरूवार व रविवारी (0८७९८) या क्रमांकासह धावणार आहेत. गोंदिया-बिलासपूर (0८२९७) द्विसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गोंदियावरून दिनांक ८, ११, १५, १८, २२, २५, व २९ जून रोजी धावेल, तर बिलासपूर-गोंदिया (0८२९८) द्विसुपरफास्ट स्पेशल बिलासपूरवरून दिनांक ९, १२, १६, १९, २३, २६ व ३0 जून रोजी धावणार आहे. गोंदिया-बिलासपूर (0८२९७) ही सुपरफास्ट स्पेशल ट्रेनच्या प्रत्येक बुधवार व शनिवारी सुटण्याच्या वेळा अशा आहेत. गोंदिया दुपारी १२.२0 वाजता, डोंगरगड दुपारी १.२१, राजनांदगाव १.४३, दुर्ग २.३५, रायपूर ३.२७, तिल्दा ४.0५, भाटापार ४.२८ व त्यानंतर बिलासपूरला पोहोचेल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.