BREAKING NEWS

Friday, May 27, 2016

लाच घेताना महिला वनरक्षकास अटक - शासकीय निवासस्थानी रंगेहात पकडले

गडचिरोली / रंगय्या रेपाकवार /--- 

    शेतकऱ्याने आपल्या घरी ठेवलेल्या सागवानाच  पाट्या जप्त करून या प्रकरणी कुठलीही  कारवाई न करण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच घेणाऱ्या अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील महिला वनरक्षक प्राची अशोकराव काळे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २६ मे रोजी आलापल्ली येथील शासकीय निवासस्थानी रंगेहात पकडले. तक्रारकर्त्याने १० वर्षांपूर्वी शेतातील सागाचे झाड कापून पाट्या तयार केल्या होत्या व घरीच ठेवल्या होत्या. वनरक्षक प्राची काळे हिला याबाबतची माहिती प्राप्त झाली. तिने तक्रारदाराच्या घराची झडती घेतली व जप्त केलेल्या पाट्या पोलीस पाटलाच्या घरी ठेवल्या. कोणतीही कारवाई करायची नसेल तर प्राची काळे हिने तीन हजार रूपयांची लाच मागितली. सदर शेतकऱ्याने याबाबतची तक्रार एसीबी कार्यालय गडचिरोली येथे केली. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी हाती घेतली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.