BREAKING NEWS

Friday, May 27, 2016

छगन भुजबळ यांनी २०३ कोटीची बेहिशेबी मालमत्ता कुटुंबियांच्या नावे फिरवल्याचा गुन्हा

मुंबई -

 


माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री असताना तब्बल २०३ कोटी २४ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केली व ती कुटुंबियांच्या नावे फिरवली असा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी नोंदवला. त्यामुळे भुजबळ कुटुंबिय आणखीणच अडचणीत आले आहेत. याच प्रकरणात लवकरच विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले जाणार आहे.
छगन भुजबळ व इतरांविरुद्ध अन्य एका गुन्ह्याची नोंद झाल्याने त्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. छगन भुजबळ यांच्यासह आमदार पंकज छगन भुजबळ, माजी खासदार समीर मगन भुजबळ, मिना छगन भुजबळ, विशाखा पंकज भुजबळ, सुनिल दामोदर नाईक, चंद्रशेखर मदनलाल सारडा, हवाला ऑपरेटर सुरेश ब्रम्हानंद जाजोदिया, वेगवेगळ्या कंपनीचे नियंत्रक जगदीशप्रसाद भालचंद्र पुरोहित, प्रविणकुमार हुकूमचंद जैन, आर्थिक सल्लागार संजीव बिमलकुमार जैन, मेसर्च स्पॅनको लिमिटेडचे सीएमडी कपिल राजप्रकाश पुरी अशी या बाराजणांची नावे आहेत.
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची संबंधित विभागाकडून चौकशी सुरू होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.