BREAKING NEWS

Friday, May 27, 2016

पहिली हायब्रिड बस नवी मुंबईत दाखल

नवी मुंबई - अनेक वादात अडकलेली देशातील पहिली हायब्रीड बस अखेर एनएमएमटी‘च्या ताफ्यात दाखल झाली आहे. सध्या या बसची रस्त्यावर चाचणी सुरू आहे. आठवडाभरात ती प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरेल. या प्रकारच्या दोन बसगाड्या एनएमएमटी‘च्या तुर्भे आगारात उभ्या आहेत.
एनएमएमटी‘ने डिझेलपाठोपाठ सीएनजी बस चालवल्यानंतर हायब्रीड बस चालविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जेएनएनयूआरएम‘अंतर्गत या बस घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. देशातील ही पहिलीच हायब्रीड बस असल्याने ती चालवण्याचा मान नवी मुंबईला मिळावा म्हणून एनएमएमटी प्रशासन उत्सुक होते; मात्र या बसचे उद्घाटन नवी मुंबईत न होता मुंबईत मेक इन इंडिया‘ कार्यक्रमात झाले. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ही बसच नको... असा सूरही निघू लागला होता; मात्र प्रशासनाने संबंधित कंपनीला सर्व पैसे दिले असल्याने उशिरा का होईना, या बस दाखल झाल्या आहेत.
देशभरात कोणत्याही परिवहन उपक्रमाने आतापर्यंत हायब्रीड बस चालवल्या नाहीत. एनएमएमटी‘ प्रायोगिक तत्त्वावर या बस चालवणार आहे. ही बस पाच किलोमीटर डिझेलवर; तर पाच किलोमीटर बॅटरीवर चालणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल, असा विश्‍वास अधिकार्‍यांना आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.