अमरावती / सुरज देवहाते /--

कांद्याचे भाव कधी २० ते ३० रुपये होतात तर कधी ३ ते ४ रुपयांपर्यंत कमी होतात आता तर फुकट वाटायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे यावेळीही तसेच झाले. ही बाब देशवासीयांना त्यातल्यात्यात दिलासा देणारी असली तरी शेतकरी मोठे हतबल झाले आहेत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने व उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.बाजारात सध्या मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे. अशातच आज अमरावती मधील जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपक्ष आमदार श्री बच्चू भाऊ कडू यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना आज एक निवेदन देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा समस्या सोडवा व नाफेड मार्फत १५०० रुपये प्रती क़्विटल या दराने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा किवा कांदा उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी जास्तीत जास्त मदत करावी व शासनाकडून 100 % अनुदानावर कांद्या चाळी निर्माण करण्यात याव्यात तसेच त्याकरिता अमर्याद लक्षांक देण्यात यावा शेतकऱ्यांचा कांदा खराब होऊ नये म्हणून कमीत कमी किमतीत तो वेयर हाउस ला ठेवण्याची व्यवस्था करावी , तसेच शेतकरी हितार्थ स्वामिनाथन आयोग त्वरित लागू करावा व पेरणी ते कापणी पर्यंत शेतीची सर्व कामे MREGS मधून करण्यात यावी अशी मागणी अपक्ष आमदार श्री बच्चू कडू यांनी केली आहे . यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील परिसर पोलिसांनी पूर्ण पाने बंद करून सर्व सामान्य जनतेस वेठीस धरले होते एक ते दीड घनता बरीगेट लाऊन रस्ता बंद करण्यात आला होता याच ठिकाणी प्रहर तर्फे आज मोठ्या प्रमाणात मोफत कांदा वाटून कमी झालेल्या दरांचा निषेध करण्यात आला लोकांनीही मोफत कांदा मिथ्या उत्साहाने थैल्यात भरू नेला .
यावेळी श्री बच्चू कडू पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले कि संपूर्ण देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे कांदा जेव्हा महाग झाला होता तेव्हा सरकारने 3 बैठका घेउन कांदा कसा कमी करता येईल ह्या उपाययोजना केल्या होत्या कांदा जेव्हा महाग होतो तेव्हा स्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांचे हेच प्रयत्न आता कांदा स्वत झाला तर का दिसत नाही आहेत., 3 रुपये किलोने कांदा कोणाला परवडतो हे आम्हाला मोदि साहेबांनी सांगाव ,जाल्युक्त शिवार देता आणखी काही देता "पण भाव काय तुमचा बाप देणार आहे का " शेतकर्यांना आत्महत्या करायची वेळ आली आहे , निर्यात जर बंद केली नसती तर हि परिस्थिती आली नसती सरकारी धोरणानमुळेच कांदा स्वस्त झाला मागचा वेळेस कांदा आयात केला नसता व निर्यात बंदी जर ठेवली नसती तर कांद्याचे भाव आताही चांगले राहिले असते ,एका इकडे मार इंच इंच पिकवायचा गोष्टी करायचा व इकडे खड्यात घालून त्याला मारण्याची भूमिका शासनाने थांबवावी , आंदोलन कर्त्यांना नको तेवढा पोलीस सुरक्षा इथे ठेवली त्यामुळे सर्व सामान्य जनतेला विनाकारण असंतोषा समोर जावे लागले. शेतकऱ्यांच आंदोलन हे नेहमी दाबण्याच प्रयत्न केला जातो अशी खंत सुधा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आणि त्यांनी असे म्हटले कि कांदा खरेदी केंद्रे सुरु न केल्यास सर्व कार्यालये कांद्याने भरून पालकमंत्री पासून ते कृषी मंत्री पर्यंत त्यांचा घरी आम्ही कांदा घेऊन जाऊ खरेदी केंद्रे सुरु करा नाहीतर कांदा तुम्हा कार्यालयात टाकल्या जाईल असेही ते म्हणाले यावेळी श्री मोहोड , श्री छोटू महाराज वसु व इतर कार्यकर्त्ये व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
Post a Comment