BREAKING NEWS

Saturday, May 21, 2016

४ जणांचा आगीत होरपळून मृत्यु धक्कादायक घटना

दर्यापूर / --



दर्यापूर तालुक्यातील  मार्कंडा या गावातील शेतकरी कुटुंबाच्या घराला लागलेल्या भीषण आगीत कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुले यांचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक  घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. नीलेश वाघमारे (४४), पत्नी चंदा वाघमारे (३५), सर्मथ (७) व समृद्धी वाघमारे (३) असे या जळीत प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या सदस्यांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी १ वाजेदरम्यान नीलेश कामावरून घरी आल्यावर हातपाय धुऊन घरातील ओसरीत मुलांना घेऊन बसले होते. गॅस सिलेंडर संपल्यामुळे पत्नी चंदा घराच्या मागील भागात चुलीवर स्वयंपाक करीत होती. हवेच्या झोक्याने चुलीतील निखारा तुर्‍हाट्यांवर पडल्याने घराने अचानक पेट घेतला. माती व तुर्‍हाट्यांचे घर असल्याने क्षणार्धात संपूर्ण घर भकडले. पत्नी जळत असल्याचे पाहून नीलेशने दोन्ही मुलांना छातीशी कवटाळून घेतले. मात्र, घराचा जळता भाग त्यांच्याही अंगावर कोसळल्याने तेही गंभीरपणे भाजले. गावकर्‍यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी घराकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत चंदा, मुलगा सर्मथ व चिमुकली मुलगी समृद्धी यांचा मृत्यू झाला होता. ८0 टक्के भाजलेल्या अवस्थेत नीलेशला अमरावती येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्याचाही मृत्यू झाला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.