BREAKING NEWS

Friday, May 20, 2016

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या कराटेपटू चे नेत्रदीपक यश * *पाच वर्षाची चिमुकली आरोहीला रजत पदक*

रंगय्या रेपाकवार /

*गडचिरोली ---*

/-

शोतोकान कराटे संघातर्फे आयोजित पुणे येथे नुकतेच संपन्न
झालेल्या आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या कराटे पटूनी तीन
सुवर्ण,दोन रजत आणि एक कास्य पदक प्राप्त केले असून राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण
शिबिरातही चमकदार कामगिरी केली आह.
   पुणे येथे आयोजित शोतोकान कराटे संघाकडून राष्ट्रीय कराटे स्पर्धा आणि
राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत
देशाच्या विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात कराटे पटूनी सहभाग घेतला होता
गडचिरोलीचे कराटे पटूनी या स्पर्धेत सहभागी झाले होते.या राष्ट्रीय कराटे
स्पर्धेत गडचिरोलीचे ओम पोरेटी याने कांता या स्पर्धेत सुवर्ण पदक तर फाईट
मध्ये कास्य पदक पटकाविले,चेतन लोहकर यांनी सुवर्ण आणि रजत पदक,महेश मेश्राम
सुवर्ण तर सचिन उइके यांनी रजत पदक मिळविले या स्पर्धेत उत्कृष्ठ फ़ाइटर म्हणून
चेतन लोहकरे याची निवळ करण्यात आली.विशेष म्हणजे या स्पर्धेत गडचिरोलीची पाच
वर्षीय आरोही चव्हान हिने फाईट मध्ये रजत पदक प्राप्त केले.तसेच कराटे
प्रशिक्षण शिबिरातही गडचिरोलीच्या कराटे पटूनी चमकदार कामगिरी केली.कराटे
पटूच्या यशाबद्दल कराटे असोशियसन चे अध्यक्ष प्रशांत वाघरे उपाध्यक्ष रुपराज
वाकोडे यांनी कराटे पडूचे अभिनंदन केले.कराटे पटूनी आपल्या यशाचे श्रेय
प्रशिक्षक योगेश चव्हाण आणि आई,वडिलांना दिले

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.