BREAKING NEWS

Friday, May 20, 2016

जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली झाडे जमीनदोस्त सावंगी मग्रापुर येथील घटना, रात्रीच्या अंधारात केले कृत्य


चांदूर रेल्वेः/ शहेजाद खान /--




वृक्षारोपनाच्या नावाखाली दरवर्षी हजारो झाडे लावण्याच्या देखावा निर्माण करणाऱ्या शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली चक्क २५ वर्षांच्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर गावी घडला.
चांदूर रेल्वे तालुक्यातील मौजा सावंगी मग्रापुर गट क्र.२२५ मधील श्रीकांत गोविंदराव शेंडे यांच्या ४.१९ हेक्टर शेताच्या धुऱ्यावरून नाला गेला. या नाल्याचे खोलीकरण कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेतंर्गत करण्यात आले. सदर काम रात्रीच्या अंधारात करण्यात आले असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. सदर काम करतांना शेताच्या बांधावरील २५ वर्षापूर्वीचे ५ झाडे होती. त्यापैकी दोन झाडांची कोणतीही अडचन नसतांना ती पाडण्यात आली. जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आलेल्या नाली खोलीकरणाच्या या निकृष्ट दर्जाच्या कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. तसेच शेतमालकाची व वनविभागाची परवानगी न घेता सागाची झाडे पाडल्यामूळे संबधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रीकांत शेंडे यांनी जिल्हाधिकारी,चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अमरावती, उपविभागीय कृषी अधिकारी अमरावती, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.