चांदूर रेल्वेः / शहेजाद खान /--

चांदूर रेल्वे पोस्ट ऑफीस ग्राहकाच्या सोईपेक्षा गैरसोयीसाठी जास्त प्रसिध्द आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आज आला. चांदूर रेल्वे पोस्ट ऑफीसचे विमा हप्ता, विज बिल भरणा व स्पिड पोस्ट काऊंटर दोन दिवसापासून बंद आहे. या काउंटरचे प्रिंटर बंद पडल्यामूळे पोस्ट विमा हप्ता, विज बिल भरणा व स्पिड पोस्टची कामे ठप्प पडली असून येणाऱ्या ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सकाळपासून अनेक ग्राहक पोस्ट विमा हप्ता, विज बिल व स्पिड पोस्ट करण्यासाठी आले. परंतु काउंटरवरील प्रिंटर खराब झाल्यामूळे रक्कम भरता येत नसल्याने ग्राहकांना परतावे लागले. दुपारी १२.३० वा.लंच ब्रेक संपल्यानंतर अनेक ग्राहक बराच वेळ काऊंटर जवळ उभे राहीले. काउंटरवर क्लोजचे बोर्ड लावलेले होते. लंच ब्रेक संपूनही काऊंटर का उघडले नाही याची ग्राहकांनी विचारणा केली. त्यावेळी प्रिंटर खराब झाल्याचे बाबू सांगीतले. उद्या सकाळी येऊन रक्कम भरा असा मोलाचा सल्ला यावेळी दिला. पोस्ट कर्मचाऱ्यांचे ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी प्रिंटर खराब झाल्याची सुचना त्या काऊंटर लावली नाही. त्यामूळे पोस्टात येणाऱ्या प्रत्येकांना याचा चांगलाच त्रास झाला. सदर प्रिंटर कालपासून बंद पडले आहे. परंतु प्रिंटरच्या दुरूस्तीसाठी अमरावती कार्यालयातून एकही तांत्रिकी मात्र वृत्त लिहेपर्यंत आलेला नव्हता. त्यामूळे तिसऱ्या दिवशीही पैसे भरणार्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे हे मात्र नक्की.
Post a Comment