चांदूर रेल्वे / शहेजाद खान //--

एलईडी लाईट खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून विरोधी पक्ष भाजपाने यांचा जोरदार विरोध केल्यानंतर सत्ताधारी काँग्रेसने एलईडी लाईट बसविण्याचा टेंडर बहुमताने मंजुर केले. त्या बिलाच्या कमीशन वसुलीसाठी नगराध्यक्ष अभिजित सराड यांनी दोन खंडणी बहाद्दर नगरसेवकांना पाठविलेले आहे. या प्रकरणात नगराध्यक्ष अभिजित सराड दोषी असून त्यांनी नगराध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा व शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपाचा गटनेता तथा नगरसेवक शंकरलाल मानकानी यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
चांदूर रेल्वेचे बच्चू वानरे व बंडू आठवले या दोन नगरसेवकांवर खंडणी व जीवे मारण्याचे धमकी दिल्याचे बातमी वृत्तपत्रात प्रकाशीत झाली. त्यातील बच्चू वानरे हे भाजपाचे नगरसेवक असल्याचे वृत्त प्रकाशीत झाले आहे. परंतु नगरसेवक बच्चू वानरे यांना दोन वर्षापूर्वी नगराध्यक्षाच्या निवडणूकीच्या वेळी पक्षाशी बंडखोरी केल्यामूळे त्यांना भाजपातून निलंबीत केले असून त्याचा पक्षाशी सबंध नाही. ते काँग्रेसशी सबंधीत असल्याचे मानकानी यांनी सांगीतले. चांदूर रेल्वेच्या एलईडी लाईटच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाला असून या विषयावर सभागृहात भाजपाने प्रखर विरोध नोंदविला. सत्ताधारी काँग्रेसने खुप जास्त फरकाचे टेंडर बहुमतांनी मंजुर केले. ५५ लाख रूपयांच्या या कंत्राटातील १५ लाख रूपये कंत्राटदारालाअदा करण्यात आलेले आहे. काँग्रेसचे नगरसेवक बंडू आठवले व बच्चू वानरे हे न.प.सभागृहात नेहमी दादागीरी करून असभ्य भाषेचा वापर करतात. ऐवढेच नव्हेतर सभागृहात आपले मत मांडणाऱ्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या अंगावर चालून जातात. नगराध्यक्षांना प्रश्न विचारले असता हे दोन खंडणीबहाद्दर नगरसेवक नगराध्यक्षाला अजिबात बोलू देत नाही व स्वतःच पुढे बोलतात. सभागृहात अरेरावी, शिवीगाळ करणे व अंगावर चालून जाने हे त्यांचे नित्यवर्तन झालेले आहे. यापूर्वी चांदूर रेल्वेचे मुख्याधिकारी यांचा अंगावर हे दोघे नगरसेवक चालुन गेले होते. या दोन गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकांवर व त्यांना पाठींबा देणारे नगराध्यक्षांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शंकरलाल मानकानी यांनी केली. या पत्रकार परिषदेला भाजप नगरसेवक सर्व श्री सचिन जयस्वाल, तालुकाध्यक्ष रविंद्र उपाध्ये, शहराध्यक्ष प्रमोद नागमोते, शहर उपाध्यक्ष गुड्डू बजाज, केशव वंजारी, प्रशांत कातोरे, पराग मेंढे, मधु गहूकार, अॅड राजीव अंबापुरे, उत्तमराव गावंडे, बळवंत नागणे, गजानन यादव यासह अनेक भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment