विशेष प्रतिनिधी /--/
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते अनिल महाजन यांचा आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे व राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला.
अनिल महाजन यांनी गेल्या वर्ष भरात राज्यात माळी समाजाचे तथा ओबीसी समाजाचे संघटन खूप मोठ्या प्रमाणात एकत्रित केले आहे. याची दखल थेट राज्य सरकारने व भारतीय जनता पक्षाने घेतली. अनिल महाजन यांना भाजपामध्ये ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. महाजन हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या गावाचे रहिवासी आहेत. सध्या ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत. गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे चेअरमन आहेत तसेच एक चांगले उद्योगपती ही आहेत व त्यांचे सामाजिक काम संपूर्ण राज्य भरात मोठ्या प्रमाणात आहे. जळगाव जिल्ह्यात ते भावीकाळासाठी ऐरडोंल मतदार संघातून विधानसभेचे उमेदवारी करु शकतात? प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे व राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी अनिल महाजन यांच्या रुपाने पक्षामध्ये माळी समाजाला व ओबीसी समाजाला योग्य न्याय देऊ तसेच पक्षामध्ये राज्याची महत्वाची जबाबदारीही देऊ असे यावेळी बोलताना सांगितले.
महाजन यांचा प्रवेश सोहळा जळगाव जिल्ह्यात पारोळा येथे 29 मे 2016 रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार होता परंतु 29 तारखेला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे व महसूल मंत्री यांना मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे दुष्काळ या विषयावर तातडीची बैठक बोलविल्यामुळे सदर प्रवेश सोहळा आज करण्यात आला व पुढील काही महिन्यांनी जळगाव जिल्ह्यात मोठा मेळावा आयोजित करण्यास महाजनांना सांगितला व पक्षाच्या संघटनासाठी राज्यभर महाजनांना दौरा करण्यास अनुमती दिली. तसेच पुढील वाटचालीसाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment