BREAKING NEWS

Saturday, May 21, 2016

ठेकेदार श्री हिंगासपुरे यांना एक पैसा सुद्धा मागितला नाही - कॉल डीटेल्स मध्ये उघड झाल्यास राजकीय सन्यास घेईल - नगरसेवक श्री बच्चू वानरे . यांची पत्रकार परिषदेत माहिती





शहेजाद खान / चांदूर रेल्वे /--            



   
  
 LED लाईट ठेकेदार  श्री प्रवीण हिंगासपुरे याने आम्ही 15 लाख रुपये मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी श्री बच्चू वानरे व श्री बंडू आठवले यांचा खंडणी मागणे व जीवे मारण्याची धमकी देणे हा गुन्हा राजापेठ पो स्टे  अमरावती येथे दाखल यावरून आज दिनांक २१ ला सकाळी स्थानिक चांदूर रेल्वे येथील शाशकीय विश्राम गृहात कोन्ग्रेस पक्षाचा वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यात आरोप लावण्यात आलेले दोन्ही नगरसेवक उपस्थित होते त्यांनी असे स्पष्टीकरण दिले कि एल ई डी ची ज्या प्रमाणात देखभाल व्हावी  त्या प्रमाणात देखभाल होत नाही शहरातील लावलेले अर्धेअधिक लाईट बंद स्वरूपातच आहे यामुळे ह्याबाबत विचारल्यावरून त्यांचा जिव्हारी हा मुद्दा लागल्यामुळे त्यांनी आमची खोटी तक्रार दाखल केली  . फोन कॉल ची तपासणी झाल्यानंतर आम्ही जर पैश्यांची मागणी केली असे जर आढळले तर आम्ही राजकीय सन्यास घेऊ  असे ठाम मत चांदूर रेल्वे नगर परिषद चे नगरसेवक  श्री बच्चू वानरे यांनी ठेवले  .  सदर बाब नगराध्यक्ष श्री अभिजित सराड यांचा कक्षातील असून  ह्या बाबतीत शहरातील अनेक प्रतिष्टीत नागरिकांचा तक्रारी आम्हाला येत असून नगराध्यक्ष सह इतरही नगरसेवकांनी ह्या बाबत विचारणा केली वास्तविक पाहता  15 दिवसांचा वर जर लाईट बंद असेल तर दररोज 100 रु रोज प्रमाणे त्या ठेकेदाराला दंड आकारण्यात यावयास पाहिजे असा नियम आहे .
शहरात 4 प्रभाग मध्ये प्रत्येक प्रभागात ८७ लाईट असे चार मिळून ३४८ लाईट लावण्यात येत असून हे काम अपूर्णच असूनही न.प ने त्या ठेकेदाराला १७ लाख रुपयांचे बिल आतापर्यंत दिलेले आहे यामुळे लोकप्रतीनिधिनी या बाबत काहीही बोलू नये  यासाठीच हे षड्यंत्र या ठेकेदाराने रचले आहे .
चांदूर रेल्वे नगर परिषदेने आतापर्यंत गेल्या  2 वर्षापासून कॉंग्रेस चा सत्ताकाळात कोट्यावधी रुपयांची कामे केली असून काही कामे सुरु असल्याचे मत नगराध्यक्ष श्री अभिजित सराड यांनी व्यक्त केले , कोणत्याही कामाबाबत लोकप्रतीनिधिनी विचारणा करू नये ? हा कोणता न्याय ?
आणि ह्या प्रकारचा खोट्या तक्रारी दाखल करून यापुढे मुकाट्याने सर्व बिले काढून घ्यावे   अन्यथा आम्ही तक्रार दाखल करू असाच अर्थ निघत असल्याचे मत नगराध्यक्ष  व नगर सेवक  ठठ कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रदीप भाऊ वाघ यांनी व्यक्त केले  यावेळी शहरात होत असलेल्या विकास कामाबाबत सुधा प्रकाश टाकण्यात आलासदर पत्रकार परिषदेला सर्व श्री नगराध्यक्ष अभिजित सराड ,   कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष  प्रदीप वाघ , नगरसेवक बच्चू वानरे , बंडू आठवले   सतीश देशमुख ,  प्रफुल्ल कोकाटे , अनिल आठवले , सौ वैशाली कोरडे , सौ ठाकूर    आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.