अमरावती / सुरज देवहाते /--

अमरावती मधील पार्वती नगर मधील विविध समस्यांसाठी सदर परिसरातील नागरिक १९ मे रोजी म्हणजे उद्या अमरावती महानगर पालिके समोर "बैठा सत्याग्रह " करणार आहेत . आदिवासी होस्टेल पासून ते पार्वती नगर चौकापर्यंत तसेच स्थानिक प्रशांत ट्रेडर्स ते गजानन महाराज मंदिर पर्यंत पक्का रस्ता करणे , नाल्या पक्या करणे , काही ठिकाणी रोज साफ सफाई होत नाही ती व्यवस्थित करणे व प्रशासनाची कुंभकर्णी झोप मोडण्याकरिता आकोली रोड परिसरातील नागरिक व आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्त्ये "बैठा सत्याग्रह " करणार आहेत मागील 15 वर्षापासून परिसरातील नागरिक सदर समस्येसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत मात्र कुठलीही समस्या सुटायला तयार नाही , सदर रस्त्याची कामे हि पावसाळ्यापूर्वी व्हावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे 28 फेब्रुवारीला याच बाबतीत आम आदमी पक्षातर्फे पालकमंत्री श्री प्रवीण पोते व बडनेरा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री रवी भाऊ राणा व महापौर यांचा कडे सतत याच संदर्भात पाठपुरावा या आधी केला आहे . सदर "बैठा सत्याग्रह " ला उद्या ठीक ११ वाजता सुरवात होईल अशी माहिती आम आदमी पक्षाचा प्रतिनिधींनी कळविली आहे , सदर "बैठा सत्याग्रह " चे नेतृत्त्व आम आदमी पक्षाचे श्री नितीन भाऊ गवळी , प्रदीप चौधरी , सुधीर ढाकुलकर , प्रवीण शेगोकार , संजय शहाकार , वसंत पाटील , वीरेंद्र उपाध्याय , मोबीन खान , चंद्रशेखर कुरळकर , अतुल वानखडे , अधिवक्ता -श्री नितीन उजगावकर व सर्व कार्यकर्त्ये करणार आहेत त्यात स्थानिक नागरिक मध्ये श्री ज्ञानेश्वर पातसे महाराज , अनिल भोंडे , सुनील सोळंके , पांडे साहेब , पंढरी ठाकरे , अशोक धोटे ,प्रवीण इचे , प्रकाश राठोड , संजय भाकरे , प्रदीप भोकरे , निलेश लेंडे आदी नागरिक सहभागी राहणार आहेत
Post a Comment