सुरज देवहाते / अमरावती / -
विनाकारण सूड बुद्धीने गैरहजर दाखवून बडतर्फ केलेल्या श्री मदन शेळके या शिक्षकाचे न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपोषण अद्यापही सुरूच सुरूच आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आज मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आधीही पोलिसांनी त्यांना जबरदस्ती दवाखान्यामध्ये भरती केले होते, म्हणजे पोलीस डॉक्टर झाले कि काय असे मत त्यांनी व्यक्त केले कारण ज्या दिवशी पोलिसांनी जबरदस्ती घरचा पत्नी व मुलांसह रात्री ११ चा सुमारास ओढताड करून त्यांना जबरदस्ती गाडीत बसून इर्विन ला दाखल केले होते , त्या दिवशी त्यांची प्रकृती पाहायला कुठलाही अधिकृत डॉक्टर आलेला न्हवता , तेव्हाही प्रतक्ष पोलिसांनी येऊन तुमची प्रकुर्तीखालावली आहे तुम्हाला दवाखान्यात न्यायचे आहे म्हणून जबरदस्ती भरती केले , आणि आता मात्र मात्र उपोषणदरम्यान एकाही प्रशासकीय अधिकारी वा जनप्रतिनिधीने साधी भेट देऊन विचारपूस करण्याचे सौदार्य दाखविले नाही.
मदन शेळके, असे उपोषण करणार्या शिक्षकाचे नाव आहे. चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणार्या मारिझडप येथील शाळेवर सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते. तत्कालिन अधिकार्यांनी त्यांना पैसे न दिल्याच्या कारणावरून एक वष्रे गैरहजर दाखवत निलंबित न करता पगार बंद केला होता व ३ वर्षांनंतर सेवेतून बडतर्फ केले होते. त्यांनी बडतर्फीच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा निकाल देताना अप्पर आयुक्तांची दोन महिन्यांची थकबाकी देण्याचे आदेश दिले असताना देखील टाळाटाळ केली गेली. त्यामुळे त्यांनी शासनाकडे आणि जि.प. प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यावरून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांची केलेल्या पुर्नचौकशीत ते शाळेवर हजर असल्याचे निष्पन्न झाले.
नाहकपणे बडतर्फीची कारवाई केल्याचे सत्य उघडकीस आले व पगारातून एल.आय.सी. चे प्रतिमाह १३७ रुपये कपात झाली. मात्र सदर रक्कम LIC कार्यालयात न पाठविता शिक्षण विभाग चिखलदरा पंचायत समितीने गहाळ केल्याचा त्यांच्या आरोप आहे. तसेच ९ फेब्रुवारी २0१६ रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्याने रक्कम तत्काळ शेळके यांना देण्याचे आदेश असताना देखील कार्यालयातील कर्मचार्याने त्यांना लाच मागत आदेशाचे पालन केले नाही, असेही शेळके यांनी म्हटले आहे.
या प्रकरणामुळे त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाल्यामुळे त्यांनी मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे व्याजासह थकबाकी द्यावी, सर्व आर्थिक सवलती, भत्ते तसेच सर्व रक्कमेवर द.शा.द.शे. १८ टक्के व्याज देण्यात यावे ही मागणी घेऊन त्यांनी २५ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आरंभिले आहे. याबाबतचे त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जि.प. प्रशासनाला निवेदन देखील सोपविले. प्रकृती खालावल्याने त्यांना मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्याय मिळावा, यासाठी त्याच्या परिवाराने देखील साखळी उपोषण आरंभिले आहे. यात एकही प्रशासकीय अधिकारी, जनप्रतिनिधी यांनी भेट देऊन साधी विचारपुसही केली नाही तर शिक्षकांच्या न्यायासाठी भांडणार्या शिक्षक संघटनाचे तर काही पत्ताच नाही. शेळके जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांना बोलता येणे ही शक्य नाही. प्रशासन या प्रकरणाकडे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment