चांदूर रेलवे :- (शहेजाद खान)-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये शहरातील नगरपरीषद उर्दु हायस्कुल तसेच जिंगल बेल इंग्लीश स्कुल चा निकाल 100% लागला आहे. विशेष म्हणजे जिंगल बेल स्कुलचा सलग तिसऱ्यांदा दहावीचा 100% निकाल लागला आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये नगरपरीषद उर्दु हायस्कुल व जिंगल बेल इंग्लीश स्कुलचे दहावीचे संपुर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन जिंगल बेलचा कुणाल पाञीकर याने 92.60% गुण मिळवुन शाळेतून प्रथम तसेच मेरीट सुचीमध्ये येण्याचा मान पटकाविला. तर उर्दु शाळेतील आशिया अंजुम शौकत अली हिने 78% गुण घेवुन शाळेतुन प्रथम व उमैर मोहम्मद साबीर याने 76% गुण मिळवुन शाळेतुन व्दितीय आला आहे. जिंगल बेलमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे संस्थापक दिपक डहाणे, सौ. हिमाली डहाणे, मुख्याध्यापक अतुल उज्जैनकर व शिक्षकवृंदानी केले. तसेच उर्दु शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल करीम देशमुख, पठान सर, वकार सर, वर्गशिक्षक मोहम्मद वसीम, अर्शीया मैडम व इतर शिक्षकांनी केले आहे. या निकालाची मूळ प्रत येत्या 15 जूनला दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

Post a Comment