चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
मृग नक्षत्र जरी लागला तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या वादळी वाऱ्यासह पडणारे पाणी हे अवकाळी स्वरूपाचे असल्याने ह्या पावसाचा तडाखा सध्या चांदुर रेल्वे तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात बसला असुन तालुक्यातील कळमगाव, कळमजापुर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यात अवकाळी पावसाने जणु कहरच केला असुन अनेक घरांच्या पडझडी, शेतातील भाजीपाला अन्य पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असुन नजीकच्या कळमगाव व कळमजापुर येथे अनेक घरांचे टिनपत्रे उडाले. कळमगाव येथील प्रदिप वाघ यांचे घरावरील टिने उडाली असुन अनेकांची घरांची पडझड झाली. तसेच कळमजापुर येथे सुध्दा खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कळते.तसेच येथील सुरेश मेश्राम यांच्या घरावरील पुर्ण टिनपत्रे उडुन बाजुला पडल्याने घरात पाणीच पाणी झाल्यामुळे घरातील तुर, गहु, दाळ व इतरधान्य महत्वाचे कागदपत्रे पाण्यात भिजले. यामध्ये त्यांचे अंदाजे 50 हजार रूपयांचे नुकसान झाले असुन त्याची तक्रार तहसिलदार राजगडकर यांच्याकडे दिली आहे. तहसिलदार यांनी तातडीने सर्वेक्षणाचे आदेशसुध्दा दिलेले आहे.
अगोदरच जर्जर झालेला शेतकरी, शेतमजुर अशातच वरूणराजाच्या अवकृपेने व वादळी वाऱ्याने जास्त बेजार करून सोडल्याने जगीवे की मरावे अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे. तरी शासनाने यांना वेळीच मदतीचा हात द्यावा अशी मागणी कळमजापुरचे उपसरपंच रविंद्र वऱ्हाडे, राजेश जैन आदींनी केलेली आहे..
मृग नक्षत्र जरी लागला तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या वादळी वाऱ्यासह पडणारे पाणी हे अवकाळी स्वरूपाचे असल्याने ह्या पावसाचा तडाखा सध्या चांदुर रेल्वे तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात बसला असुन तालुक्यातील कळमगाव, कळमजापुर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.चांदुर रेल्वे तालुक्यात अवकाळी पावसाने जणु कहरच केला असुन अनेक घरांच्या पडझडी, शेतातील भाजीपाला अन्य पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असुन नजीकच्या कळमगाव व कळमजापुर येथे अनेक घरांचे टिनपत्रे उडाले. कळमगाव येथील प्रदिप वाघ यांचे घरावरील टिने उडाली असुन अनेकांची घरांची पडझड झाली. तसेच कळमजापुर येथे सुध्दा खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कळते.तसेच येथील सुरेश मेश्राम यांच्या घरावरील पुर्ण टिनपत्रे उडुन बाजुला पडल्याने घरात पाणीच पाणी झाल्यामुळे घरातील तुर, गहु, दाळ व इतरधान्य महत्वाचे कागदपत्रे पाण्यात भिजले. यामध्ये त्यांचे अंदाजे 50 हजार रूपयांचे नुकसान झाले असुन त्याची तक्रार तहसिलदार राजगडकर यांच्याकडे दिली आहे. तहसिलदार यांनी तातडीने सर्वेक्षणाचे आदेशसुध्दा दिलेले आहे.
अगोदरच जर्जर झालेला शेतकरी, शेतमजुर अशातच वरूणराजाच्या अवकृपेने व वादळी वाऱ्याने जास्त बेजार करून सोडल्याने जगीवे की मरावे अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे. तरी शासनाने यांना वेळीच मदतीचा हात द्यावा अशी मागणी कळमजापुरचे उपसरपंच रविंद्र वऱ्हाडे, राजेश जैन आदींनी केलेली आहे..
Post a Comment