BREAKING NEWS

Monday, June 6, 2016

जिल्हयातील 76 ग्रामपंचायतच्या 9 जुलै रोजी निवडणूका ---- निवडणूक आयोगाने केला कार्यक्रम घोषित

 चंद्रपूर/  प्रवीण गोंगले /---            

 
                      
- चंद्रपूर जिल्हयातील जुलै 2016 मध्ये मुदत संपणा-या राजूरा तालुक्यातील 28, जिवती तालुक्यातील 22 व कोरपना तालुक्यातील 26 ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला असून या 76 ग्राम पंचायतीच्या निवडणूका 9  जुलै 2016 रोजी होणार आहे.

               निवडणूकांची नोटीस प्रसिध्द करण्याची तारीख 8 जून 2016 असून नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक 20 जून ते 23 जून 2016 दरम्यान वेळ 11 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. 24 जून रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. 28 जून 2016 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्ह तसेच अंतिम रित्या निवडणूक लढणा-या उमेदवारांची यादी 28 जून रोजी दुपारी 3 वाजेनंतर प्रसिध्द करण्यात येईल. मतदानाचा दिनांक 9 जुलै 2016 असून मतमोजणी 11 जुलै रोजी होईल. निवडणूकांचा निकाल 12 जुलै 2016 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
               राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या या क्षेत्रात तात्काळ प्रवाहाने आचारसंहिता लागू करण्यात आली असून ही आचारसंहिता निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी कळविले आहे. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.