BREAKING NEWS

Monday, June 6, 2016

धाडसी घरफोडीने हादरले चंद्रपूर, उद्योजक नवीन मित्तल यांच्या घरी १२ लाखांची घरफोडी , शहरातील सततच्या घरफोडीच्या घटनांनी नागरिक भयभीत


चंद्रपूर / प्रवीण गोंगले /-                        
 
 
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पोलिस यंत्रणेला आव्हान देणा-या चो-या आणि घरफोडीसत्राने नागरिक धास्तावले आहेत. ताज्या घटनेत शहरातील विवेकानंदनगर या वडगाव परिसरातील उच्चभ्रू वस्तीत उद्योजक नवीन मित्तल यांच्या घरी चोरट्यांनी डाव साधत सुमारे १२ लाखांचा मोल्यवान ऐवज लंपास केला. हादरलेल्या यंत्रणेने आरोपींच्या शोधासाठी तपास गतिमान केला आहे.    
---------------------------------------------------------------------------------------------------------

चंद्रपूर शहरातील उच्चभ्रु वस्तीतील वडगावच्या विवेकानंदनगर भागात वास्तव्याला असलेल्या उद्योजक नवीन मित्तल यांच्या घरी झालेल्या धाडसी घरफोडीने पोलिस यंत्रणा हादरली आहे. ३ जून च्या संध्याकाळी मित्तल कुटुंबीय काही कामानिमित्त नागपुरला गेले होते. दरम्यान हे घर कुलुपबंद स्थितीत होते. ५ च्या संध्याकाळी नागपुरातून परतल्यावर मित्तल कुटुंबियाना घराचे दार तुटलेल्या वस्थेत तर घरातील सामान अस्ताव्यस्त स्थितीत असल्याचे आढळून आले. त्यांनी या प्रकारची तक्रार रामनगर पोलिसांकडे केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचत तपास सुरु केला आहे. दरम्यान दरवेळेस बाहेरगावी जात असताना मित्तल कुटुंबीय सुरक्षारक्षक ठेवून जात होते मात्र यावेळेस त्यांनी सुरक्षारक्षक ठेवला नाही. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १२ लाखांचा ऐवज लंपास केल्याची माहिती घरमालक नवीन मित्तल यांनी दिली आहे. यात सोन्या-चांदीचे आणि रोख रकमेचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या घरफोडीच्या उजेडानंतर ५ पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी , स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यासह मोठा फौजफाटा आरोपींच्या शोधासाठी तैनात केला आहे. याबाबत रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत चव्हाण यांनी घरी कुणी नसल्याचे हेरून अशा घरफोड्या होत असल्याचे सांगत नागरिकांनी बाहेरगावी जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेले काही महिने चंद्रपूर शहरात चो-या आणि घरफोड्यांना उत आला आहे. मात्र या कोणत्याही घटनांतील आरोपी अद्याप जेरबंद झालेले नाहीत. अशातच वडगाव भागात झालेल्या या ताज्या घटनेने पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.