BREAKING NEWS

Monday, June 6, 2016

पर्यावरण संरक्षण काळाची गरज - जिल्हा न्यायाधीश

चंद्रपूर/  प्रवीण गोंगले /----------         


                                      

- पर्यावरण हे प्रत्येक नागरिकाशी संबंधित असून प्रत्यकाने एक झाड लावून संवर्धन करण्याचा संकल्प केल्यास पर्यावरणाविषयी आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली असे होईल. पर्यावरण संतुलन राखण्याची हीच खरी वेळ असून पर्यावरण संरक्षण काळाची गरज असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची यांनी व्यक्त केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने वन प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी या ठिकाणी जागतिक पर्यावरण या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  पर्यावरणाच्या बाबतीत असलेल्‍या कायदयाची जन माणसात जागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व्हि.आर.सिकची, जिल्हा न्यायाधीश गिरीष अग्रवाल, एन.आर.नाईकवाडे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव पी.एस.इंगळे, अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन पी.एस.सपाटे, सहाय्यक सरकारी वकील नागपूरे, संचालक वन प्रशासन विकास व व्यवस्थापन अशोक कवीटकर, डीएफओ वाघाळे हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला न्यायदंडाधिकारी सौ.बन्सोड, सहा.वन संरक्षक मोरे, पॅरा लिगल व्हॅलेंटिअर्स ताजुदूदीन शेख, योगेश सादलावार, सुनिता सिंग, राम हरणे, सामाजिक कार्यकर्ते ख्वाजाभाई व राजेश अडुर उपस्थित होते.मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे हे आपल्या भाषणात म्हणाले इंधन, पेट्रोल, डिझल व कोळसा याच्या वापरामुळे कॉर्बनडॉय आक्साईड हे मोठया प्रमाणात सोडल्या जाते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा हा भारतातील चौथ्या क्रमांकावर प्रदूषीत जिल्हा म्हणून गनल्या गेला आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील नागरिक हे एकत्रीत होवून लढा देत आहेत.  या लढयाला वृक्ष लागवडीची जोड देणे आवश्यक आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव पी.एस.इंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जंगलातील झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा -हास झालेला आहे. त्यामुळे झालेल्या तापमान वाढीमुळे समुद्राजवळील शहरे समुद्राच्या पाण्याखाली येण्याचा धोका निर्माण झालेला आहे.  पर्यावरणाचा समतोल साधण्याकरीता सर्वांनी संत तुकाराम यांनी सांगितलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या म्हणी प्रमाणे वृक्षांचे व जंगलाचे संगोपण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन संचालक अशोक कवीटकर यांनी तसेच वकील संघाचे अध्यक्ष पी.एस.सपाटे यांनी वन विभागाशी संबंधीत कायदयावर सविस्तर मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनअधिकारी तलमले यांनी तर संचालन वनपाल गजपूरे यांनी केले.  आभार ॲड.महेंद्र असरेट यांनी मानले.  

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.