BREAKING NEWS

Monday, June 6, 2016

जिल्हयाचा मत्स्यव्यवसाय आराखडा तयार करणार ------- पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार * तो जिआर बदलला जाईल * भोई समाज सहकारी संस्था मेळावा

चंद्रपूर/ प्रवीण गोंगले /--       




-

मच्छिमारी रोजगार देणारा व्यवसाय असून चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्हयातील मामा तलावाची दुरुस्ती करुन त्या ठिकाणी मत्स्यसंवर्धन करण्यासंदर्भात आपण पुढाकार घेतला असून जिल्हयाचा मत्स्यव्यवसाय आराखडा तयार करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मच्छिमार सोसायटयांना अडचणीचा ठरणारा शासन आदेश बदलला जाईल असे त्यांनी सांगितले. भोई समाज सहकारी संस्था यांच्या वतीने वरोरा येथे आयोजित मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्था पदाधिका-यांचा मेळावा या कार्यक्रमात ते उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दामोधर रुयारकर हे होते. आमदार सुरेश धानोरकर, बाबासाहेब वासाडे, प्रकाश मालजावळे, चंद्रकांत गुंडावार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्हयातील 6 हजार मामा तलावाची दुरुस्ती, नुतनीकरण व खोलीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या तलावात मच्छिमारी करण्यासाठी खास खड्डा करण्यात येणार आहे. हा मच्छिमारी सोसायटयांना व्यवसायासाठी देण्यात येईल. या चार जिल्हयाचे मत्स्यव्यवसाय क्लस्टर करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भातील पाण्याचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून गोसीखूर्द, पळसगांव आमडी व बेंबळा हे प्रकल्प 2017 अखेर पूर्ण झालेले असतील असे ते म्हणाले. मत्स्यव्यवसाय करतांना आधुनिक संसाधन वापरण्यावर भर देण्यात येणार आहे. विदर्भाचे मत्स्यव्यवसाय धोरण आखण्यासाठी व त्यावर अभ्यास करण्यासाठी 15 दिवसात समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भोई समाजाचे प्रश्न रास्त असून ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तीन चाकी सायकल वाटप तसेच पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना आमदार सुरेश धानोरकर म्हणाले की, मत्स्यव्यवसायिकांचे प्रश्न गंभीर असून अर्थमंत्री व पालकमंत्री म्हणून आपण हे प्रश्न प्राधान्याने सोडवावे.  मच्छिमार सोसायटया संदर्भातील अन्यायकारक जिआर रद्द करण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. वरोरा क्षेत्रात केलेल्या विकास कामाचा आढावा त्यांनी यावेळी सादर केला. बाबासाहेब वासाडे व प्रकाश मालजावळे यांची यावेळी भाषणे झालीत.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक दामोधर रुयारकर यांनी केले. या कार्यक्रमास भोई समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.  

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.