BREAKING NEWS

Thursday, June 9, 2016

महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम लवकरच सुरु करणार -- श्री सुधीर मुनगंटीवार


मुंबई / विशेष न्यूज /--

जगतज्योती महात्मा बसवेश्वर समाधीस्थळाचा विकास करण्याची घोषणा राज्याच्या २०१५ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून त्याचे नियोजन सुरु आहे. लवकरच या स्मारकाचे काम सुरु होईल असे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवाड्याचा भव्य समारोप समारंभ आज यशवंतराच चव्हाण प्रतिष्ठान मध्ये संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास  शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, महादेव जानकर यांच्यासह शिवा संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, उपाध्यक्ष शैलेश  जकापुरे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांतअप्पा शेटे, महाराष्ट्र सरचिटणीस, रुपेश होनराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवा संघटनेने महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे केले असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कपिलधार च्या विकासासाठी आपण आधीपासूनच पाठपुरावा करत असून या स्थळाचाही निश्चितपणे विकास केला जाईल. लवकरच येथील विकास कामांचा शुभारंभ आणि भूमीपुजन केले जाईल, त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे ही ते म्हणाले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनीही आपले विचार मांडले

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.