BREAKING NEWS

Thursday, June 2, 2016

सीबीआयने केलेल्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात सौ. कांचन अकोलकर यांची पुणे पोलिसात तक्रार

पुणे -




दाभोलकर हत्या प्रकरणी कारवाईच्या नावाखाली केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने १ जून या दिवशी पुणे येथील सनातनचे साधक दांपत्य श्री. आणि सौ. कांचन आकोलकर यांच्या घरी अक्षरशः घरफोडी केली. कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी घराचे कुलुप फोडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले आहे, तसेच त्यातील काही मौल्यवान साहित्य गहाळ केले असण्याची अन् त्याचा वापर खोटे पुरावे बनवण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या या अन्याय्य कारवाईच्या विरोधात सौ. कांचन आकोलकर यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत बेकायदेशीररित्या घरात घुसून घरफोडी करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे,
१ जून या दिवशी दुपारी साधारण २ वाजता माझे रहाते घर कोणीतरी फोडल्याची बातमी मला मिळाली. त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे माझ्या घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत पडले आहे.
घरातील एकमेव लोखंडी कपाट (गोदरेज कपाटासारखे) कुलुप तोडून उघडल्याचे आढळले. कपाटातील सर्व कप्पे उघडे होते आणि त्यांचे कुलुपदेखील तोडल्याचे आढळून आले. या कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले असून माझे मौल्यवान साहित्य गहाळ झाले असण्याची मला भीती वाटत आहे.
 या घटनेची आणखी चौकशी केली असता, सकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्तींनी (सूटबूट घातलेले अधिकारी) ही घरफोडी केल्याचे समजले. तसेच हे अधिकारी केंद्रीय अन्वेषण शाखेचे (सीबीआयचे) अधिकारी होते, असे समजले.
केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला चौकशीमध्ये सहकार्य करण्यास मी कधीही तयार आहे, असे सांगितले होते. असे असतांनाही माझ्या घरात बेकायदेशीररित्या घुसून घराचे आणि कपाटाचे कुलुप तोडून त्यांनी अन्वेषणाच्या नावाखाली माझ्यासारख्या गरीब महिलेवर अन्यायच केला आहे.
 घराचा तपास करायचाच होता, तर मला संपर्क करणे त्यांना सहज शक्य होते. आम्हाला अंधारात ठेवून केलेला तपास हा बेकायदेशीर असून सीबीआयच्या अनियंत्रित कारवाया सिद्ध करते.
 संबंधित अज्ञात अधिकार्‍यावर घरफोडी करणे, बेकायदेशीररित्या दुसर्‍याच्या घरात घुसणे, अधिकाराचा गैरवापर करणे या गुन्ह्यांसाठी त्यांच्या विरोधात प्रथमदर्शी (एफ्.आय.आर्.) गुन्हा नोंद करून त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.