कोल्हापूर -

श्री महालक्ष्मी मंदिरात असणार्या मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय शिवसैनिकांनी तोडले. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हिंदुत्ववाद्यांनी हे अनधिकृत शौचालय पाडण्याची मागणी प्रशासनाकडे वेळोवेळी केली होती. जिल्हा न्यायदंडाधिकार्यांनीही ते पाडण्याचा आदेश दिला होता. तथापि हा आदेश धाब्यावर बसवण्यात आला. प्रशासन एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देऊन मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडत असल्याचे, तर दुसरीकडे मंदिरातील अनधिकृत शौचालयाला मात्र अभय देत असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे. हिंदूंनी वारंवार मागणी करूनही पवित्र मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय पाडण्याविषयी प्रशासन चालढकलपणा करत असल्यामुळे शेवटी शिवसैनिकांनी दणका देत सदर अनधिकृत शौचालय तोडून टाकले. यात शौचालयचा ७५ टक्के भाग उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरही गुन्हा नोंद केलेला नाही. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय हे कुणाच्या मालकीचे आहे, यावरून देवस्थान समिती आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात वाद चालू झाल्याचे ६ जून या दिवशी पोलीस ठाण्यात पहायला मिळाले. देवस्थान समितीने संपूर्ण स्वच्छतागृहाचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण केले होते. त्यामुळे महानगरपालिकेने हे स्वच्छतागृह पाडावे, अशी भूमिका घेतली. दुसरीकडे महानगरपालिकेने मनकर्णिका कुंड हे मंदिराच्या आवारात असून ते देवस्थान समितीच्या कह्यात असल्याने स्वच्छतागृह पाडण्याचे दायित्व देवस्थान समितीकडे येते, अशी भूमिका घेतल्याचे समजते. यावरून या दोघांत वाद चालू आहे.

Post a Comment