BREAKING NEWS

Tuesday, June 7, 2016

प्रकृती बिघडल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू जोधपूरमधील रुग्णालयात दाखल !

जयपूर / -                   


               कथित लैंगिक शोषणाच्या आरोपावरून जोधपूरच्या कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना प्रकृती बिघडल्याने जोधपूरच्या गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती समजताच पू. बापूजींचे भक्त मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गोळा झाले.
पू. बापूजींच्या भक्तांकडून चालवण्यात येणारे कॉल सेंटर !
     पू. बापूजी यांच्या देश-विदेशातील लाखो भक्तांना त्यांच्याविषयीची प्रत्येक माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या भक्तांकडून सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून माहिती पुरवण्यात येते. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉलसेंटरही बनवली आहेत. यात शेकडो युवक काम करत आहे. त्यात माहिती तंत्रज्ञानातील व्यावसायिक तज्ञही सहभागी आहेत. देशभरातील सर्व कॉल सेंटरचे मुख्यालय जोधपूरमध्ये आहे. प्रतिदिन सुमारे ७० लाख लोकांना निरोप आणि सूचना पाठवल्या जातात. पू. बापूजी यांना न्यायालयात कधी नेण्यात येणार आहे, त्यांच्या जाण्याचा मार्ग कोणता आहे, न्यायालयातून ते परत कधी येणार आहेत आदी माहिती पुरवली जाते. त्यामुळे पू. बापूजी यांचे दर्शन घेण्यासाठी सहस्रावधी लोक न्यायालयाबाहेर गोळा होतात.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.