पणजी -

आपचे नेते आशिष खेतान यांनी सनातनवर बंदी घालण्याची केलेली मागणी म्हणजे काँग्रेस आणि अन्य समविचारी राजकीय पक्षांप्रमाणे हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी केलेला राजकीय स्टंट आहे. दहा वर्षे सत्तेत असतांना काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष सनातन संस्थेवर बंदी घालू शकले नाहीत, यातच सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होते. सनातन संस्था बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा निराधार आरोप करणार्या आशिष खेतान यांनी गोव्यातील न्यायालयाचा सनातनचे साधक निर्दोष असल्याचा आदेश वाचलेला नसावा, असे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांना एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, आपसारख्या पक्षाने किमान न्यायालयाच्या आदेशाचा तरी सन्मान करायला शिकले पाहिजे. सनातन निर्दोष आहे, हे माहीत असूनही सनातनवर वारंवार चिखलफेक करण्याचा आपसारख्या निधर्मी राजकीय पक्षांचा खटाटोप म्हणजे हिंदुत्वाला विरोध करण्याचे राजकारण आहे. आपसारखे भूछत्र्यांप्रमाणे उगवलेले राजकीय पक्ष येनकेन प्रकारेण प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याचा खटाटोप करतात. सध्याच्या स्थितीत सनातनवर आरोप केल्यास निधर्मीपणाची प्रतिमा निर्माण होऊन भरपूर प्रसिद्धी मिळते, हे आशिष खेतान यांच्यासारख्या राजकारण्यांनी जाणले आहे. या प्रसिद्धीच्या हव्यासातून आशिष खेतान सनातनवर बंदी घालण्याची मागणी करतात, हे गोमंतकातील सूज्ञ जनता जाणून आहे. सनातनविरोधी वातावरण निर्माण करून राजकीय लाभ मिळवण्याच्या अशा खटाटोपांना गोमंतकीय बळी पडणार नाहीत, हे आपने जाणावे. शोध पत्रकार म्हणवणार्या आशिष खेतान यांनी स्वत:च्या पक्षातील बलात्कारी आणि गुन्हेगार कार्यकर्त्यांची वस्तूस्थिती अशीच शोध पत्रकारिता करून जनतेसमोर मांडण्याचे धाडस करावे.

Post a Comment