अमरावती -

कन्हैय्या कुमार, अरविंद केजरीवाल यांसारख्या देशद्रोह्यांना देशाविषयी अभिमान नसल्याने ते सातत्याने देशविरोधी वक्तव्ये करत असतात. आपले जवान दिवस-रात्र एक करून आणि स्वतःचा जीव संकटात घालून आपले रक्षण करतात; परंतु सातत्याने भारतीय सैनिकांविषयी वाईट शब्द बोलणार्यांनी लक्षात ठेवावे की, राज्यकर्त्यांनी अनुमती दिली, तर पाकिस्तानातसुद्धा आपले जवान भगवा फडकवतील. ज्यांना देशाविषयी अभिमान नाही, त्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही, असे रोखठोख प्रतिपादन पू. नंदकुमार जाधव यांनी येथे केले. ५ जून २०१६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे ग्रामपंचायतीच्या मैदानामध्ये हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. तेव्हा ते बोलत होते.
पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नांदगाव पेठ येथील धर्मप्रेमींनी प्रभु श्रीरामाची मूर्ती व्यासपीठावर आणली होती. त्याचे पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. नांदगाव येथील धर्मप्रेमींनी श्री. सुनील घनवट यांना तलवार भेट देऊन त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी केला. सभेला २ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. माधवी चोरे हे वक्ता म्हणून उपस्थित होते.

Post a Comment