BREAKING NEWS

Thursday, June 2, 2016

डॉ. चांदेकर अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू

अमरावती --------



अमरावती येथी संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरचे डॉ. मुरलीधर चांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल कार्यालयात आज, बुधवारी झालेल्या ५ उमेदवारांच्या मुलाखतीनंतर संध्याकाळी ही निवड जाहीर करण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रात तब्बल ३0 वर्षांचा अनुभव असलेले डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथल्या एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयातून त्यांच्या करिअरचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी नागपुरातील धरमपेठ कला-वाणिज्य महाविद्यालय व जी. एस. कॉर्मस कॉलेज येथे अध्यापनाचे कार्य केले. तसेच नाशिक येथील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यानंतर २0१0 सालापासून सलग ५ वर्षे त्यांनी नागपुरातील व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची यशस्वी धुरा सांभाळली. यासोबतच त्यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासमंडळावर काम केले. ते मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर सहा वर्षे राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य होते. मुंबई विद्यापीठात राज्यपालांकडून नामित सदस्यही होते. नागपूर विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. प्राध्यापक म्हणून २0 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि प्राचार्य म्हणून त्यांनी नाशिकच्या महाविद्यालयात काम केले आहे. त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता ११ नोव्हेंबर २0१४ रोजी त्यांची रातुम नागपूर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी परीक्षेच्या कामात गती आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २४ एप्रिल २0१५ रोजी त्यांची गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षण क्षेत्रातील या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर त्यांच्याकडे अमरावती विद्यापीठाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.