BREAKING NEWS

Tuesday, June 7, 2016

जागतिक पर्यावरण दिनी चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रात वृक्ष रोपट्यांचे वाट


चांदूर रेल्वे / शहेजाद खान /----



जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रात संयुक्त वन व्यवस्थापन समिती चिरोडी व वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय यांच्या वतीने ग्रामस्थ व लहान मुलांना आवळा व कडुलिंब वृक्ष रोपट्यांचे वाटप करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त वन व्यवस्थापन समिती चिरोडी व चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी यांनी परिसराची साफसफाई केली.त्यानंतर ग्रामस्थ व लहान मुलांना आवळा, कडुलिंब वृक्ष रोपट्यांचे वाटप केले. या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे, वनपाल ओंकार भुयार, वनपाल ओंकार चौरपगार, वनरक्षक सोनाली पुंड, कल्याणी रेखे, प्रिती तिवारी, शेख इक्बाल, संतोष आखरे, श्री विघळे, व कार्यालयीन कर्मचारी अनिल माहुलकर, बाबु दशवत यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.