BREAKING NEWS

Tuesday, June 7, 2016

इंधन दरवाढ, शेतकरी समस्या , आणि वाढती महागाई संदर्भात तिवसा तालुका काँग्रेस कमिटीचे तहसीलदार तिवसा यांना निवेदन

तिवसा /--                


आज पेट्रोल ,डिझेल, दरवाढ तसेच घरगुती गॅस ची 21 रुपयांनी दरवाढ, याचबरोबर शेतकरी राजाला कुठलेही आर्थिक मदत, आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना वाऱ्यावर सोडून  केंद्र आणि राज्य सरकार निव्वळ घोषणा आणि आश्वासणाचा पाऊस पाडत आहे.
जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्याने यामुळे सार्वजनिक प्रवास, दळणवळण, भाजी पाला, धान्य, आणि प्रवास चे दर वाढणारं आहेत, यामुळे सामान्य जनतेला नाहक भुर्दंड भोगावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल कमी झाल्या असून सुद्धा इंधन दरवाढ चौथ्यादा झाली आहे.
याचा निषेध आणि दरवाढ कमी करण्याबाबत तिवसा तहसीलदार यांना तिवसा तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली तसेच शासनाला आमच्या मागण्या पोह्चवाव्या हि मागणी केली. यावेळी तिवसा तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष मुकुंद देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळबांडे , नगर अध्यक्ष सौ राजकन्या खाकसे, नगर उपाध्यक्ष वैभव स वानखडे , सर्व श्री नगरसेवक मधुकर भगत, नरेंद्र विघ्ने, सचिन गोरे, मोहिनी शर्मा , सविता सुरजूसे, संध्या पखाले, सारिका दापुरकर, संध्या मुंदाणे, कृ उ बा स उपसभापती कमलाकर वाघ , अतुल आंबूलकर, संजय दापुरकर, गोकूल खाकसे, अजय शिरभाते, आनंद शर्मा , आशिष खारकर , सेतू देशमुख,  प्रशिक शापामोहन , अंकुश बनसोड , इत्यादी पदाधिकारी  आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.