चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---

वेंâद्र शासनाने ३१ मे च्या मध्यरात्रीनंतर पेट्रोल व डिझेलवर सुमारे ४ व २.४० रूपयांनी वाढ केली. तसेच १ जुन पासुन सेवाकरात ०.५ टक्के वाढ केली. याशिवाय विना अनुदानीत सिलेंडरचे दर देखील २१ रूपयांनी वाढविल्यामूळे प्रचंड महागाई वाढली असुन केंद्र सरकारने सर्वसामान्याचा खिसा कापला आहे. अगोदरच महागाईने होळपळून निघालेल्या जनतेवर सरकारने लादलेली ही भाव वाढ अन्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वर नमुद केलेली सर्व प्रकारची दरवाढ आणि करवाढ तातडीने मागे घ्यावी आणि जनतेला दिलासा मिळवून द्यावा अशी मागणी चांदूर रेल्वे तालुका काँग्रेस कमिटीने चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली.www.vidarbha24news.com
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या विंâमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. विद्यमान केंद्र सरकार सत्तेत आले तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किमंत १०८ डॉलर प्रति बॅरल होती. आता हीच विंâमत ५० डॉलरपेक्षाही कमी आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे ५५ टक्क्यांनी घसरल्या असतांना केंद्र सरकार त्याचा लाभ भारतातील सामान्य पेट्रोल व डिझेल ग्राहकांना का मिळवुन देत नाही ? पेट्रोल-डिझेलच्या किमतीत देखील कच्च्या तेलाच्या विंâमतीच्या प्रमाणात कमी का होत नाहीत? असे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.vidarbha24news
सेवा करातील करवाढीमुळे रेल्वे प्रवास, वैद्यकिय तपासनी, विमा, मोबाईल बिल, शिवनेरी व अन्य वातानुकुलीत बसचा प्रवास, सिनेमा तिकिटे, बँकिंग , हॉटेल आदी सेवा महागणार आहेत. विशेष म्हणजे सेवाकरातील ०.५ टक्के करवाढीला कृषी कल्याण अधिभार असे नाव देण्यात आले. मागील दोन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडुन शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी करीत असतांना ती मान्य झालेली नाही. शेतीमालाला पुरेशी नुकसान भरपाई आणि थेट भरीव आर्थिक मदतही मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा नावाखाली सेवाकरात कृषी कल्याण अधिभार लादण्याचा सरकारला काय नैतीक अधिकार आहे ? असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे. त्यामूळे सरकारने सर्व प्रकारची भाववाढ व करवाढ त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी निवेदनातून शासनाकडे केली. निवेदन देतांना सर्व श्री श्रीनिवास देशमुख, गणेश आरेकर, गोविंद देशमुख, अशोक चौधरी, भानुदास गावंडे, राजेंद्र राजनेकर, रूपेश पुडके, प्रविण घुईखेडकर, उमेश केने, प्रदिप वाघ, शेषराव लोमटे, संगीत हजारे, अरूण शेळके सह चांदूर रेल्वे तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment