नवी दिल्ली -

बहुजन समाज पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता देण्यात आली आहे; मात्र यासाठीच्या निकषांची हा पक्ष पूर्तता करत नसल्याने त्याची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता रहित करावी, अशी मागणी करणारी याचिका ज्येष्ठ अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राष्ट्रीय पक्षाची मान्यता असणार्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत किमान ४ राज्यांमध्ये मिळून ६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे. तसेच कमीतकमी ४ जागांवर त्यांचा उमेदवार विजयी झालेला असला पाहिजे. शिवाय लोकसभेच्या एकूण जागांच्या २ टक्के जागा जिंकणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ४ राज्यांमध्ये त्याला राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली असली पाहिजे. या अटींची बसप पूर्तता करत नसल्याचे श्री. जैन यांनी याचिकेत म्हटले आहे.

Post a Comment