चांदूर रेल्वेः / शहेजाद खान /----
खांबावर काम करतांना विजेचा धक्का लागुन एका २४ वर्षीय शिकावु लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील निमगव्हाण या गावी गुरूवारी (ता.२८) दुपारी १२ वाजता घडली. रमेश संजय पडघन (वय २४) रा.खरबी असे त्या युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार संजय रमेश पडघन हा विज वितरण कंपनी मध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी स्थायी लाईनमन रामदास चनेकार व शिकाऊ लाईनमन श्री संजय पडघान दोघे निमगव्हाण येथे विज दुरूस्तीच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी रामदास चनेकार हे स्वतः खाली थांबले व संजय पडघान याला खांबावर चढविले. खालुन चनेकार खांबावर चढलेल्या संजयला निर्देश देत होते. अशातच संजय पडघन याला विजेचा धक्का लागुन तो खाली कोसळला. रामदास चनेकारने त्याला लगेच चांदूर रेल्वेच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या पश्चात रोज मजुरी करणारे वृध्द आईवडिल व दोन बहिणी असुन त्यातील एक अपंग आहे. विज खांबावर स्थायी लाईनमन का चढले नाही व विज प्रवाह सुरू असतांना एका शिकाऊ उमेदवाराला विज दुरूस्तीचे काम का देण्यात आले. संजयला शॉक लागल्याने की शिडी तुटून खाली कोसळला असे एक ना अनेक तर्क वितर्क सुरू असले तरी विजेचा शॉक लागुन संजयचा मृत्यु झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. शव विच्छेदन अहवालानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई होईपर्यंत संजयचे शव विच्छेदन होऊ देणार नाही असा पावित्रा मृतक संजयच्या आईवडिलांनी घेतला आहे. तर सदर प्रकरण विज वितरण कंपनीवर शिंकत असल्यामुळे कंपनी हात झटकत असल्याचे दिसत आहे.
Post a Comment