बुलडाणा : दयालसिंग चव्हाण /-----

जिल्यातील गेल्या तीन दिवस झालेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. नदी-नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक क्षेत्रात पाणी साचलेले आहेत. खामगाव तालुक्यात मंगळवारी अतवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आल्याने नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत दिली जाणार आहे. खामगाव तालुक्यात दमदार पाऊस होत असल्याने पीकपरिस्थिती समाधानकारक आहे.. सोमवार रात्रीपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला एकदम धो-धो पाऊस बरसल्याने नदी नाल्यांना पूर आले. खामगाव-मेहकर रोडवरील आवार गावाजवळील पुलावरून वाहत असल्याने सकाळी ८ वाजताच्या सुमारास दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. पुलावरून पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. शेती पिकाचे होणारे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पर्यंत जिल्हयात 60 ते 70 टक्के पासुन पडला आहे. 2-3 दिवसापासुन सुरु असलेल्या पावसामुळे मात्र जिल्यातील प्रकल्पातील जलसाठयांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. बऱ्याच ठिकाणी जमिनही खरडुन नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली आहे. शेतीचे कामे सुध्दा पाण्यामुळे बंद पडलेली आहे. संग्रामपुर तालुक्यात सुध्दा नदी नाल्याने पुर आले आहे. संग्रामपुर तालुक्यात काथरगांव पिंप्री येथे गावात जाण्यासाठी रस्ता सुध्दा बंद पडलेला आहे. तालुक्यातील वान धरणाचे 4 दरवाजे 30 सेमी ने उघडले आहे व वान नदीवरील गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्यात सरासरी 447.8 मिमी 62.84 टक्के पाऊस झाला आहे.

Post a Comment