BREAKING NEWS

Friday, July 29, 2016

हिंदु संत, नेते आणि संघटना यांच्यावरील अन्याय न थांबल्यास राज्यभर आंदोलन ! समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे आझाद मैदानात आंदोलन ८५० हून अधिक हिंदुत्ववाद्यांची शासनाला चेतावणी

  मुंबई -



पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसतांना त्यांना अजूनही कारागृहात ठेवण्यात आले आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची अन्याय्य मागणी होत आहे. वरील सर्वांची कारागृहातून सुटका करण्यात यावी आणि सनातन संस्थेची अपकीर्ती थांबवून सनातनचे निष्पाप साधक श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची त्वरित सुटका करण्यात यावी, या मागण्यांसाठी येथील समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन आझाद मैदानात २८ जुलै या दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत आंदोलन केले. हिंदु संत, नेते आणि संघटना यांच्यावरील अन्याय्य कारवाई न थांबल्यास महाराष्ट्रात आंदोलनाची लाट उसळेल, अशी चेतावणी या आंदोलनाद्वारे संत आणि हिंदुत्ववादी यांनी शासनाला दिली. आंदोलनाला धर्मप्रेमी संघटना आणि हिंदुत्ववादी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, हर हर महादेव यांनी आझाद मैदानाचा परिसर दणाणून गेला. आंदोलनाला ८५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती लाभली.
     साध्वी प्रज्ञासिंह यांचे नातेवाईक श्री. भगवानदास, श्री. धनंजय देसाई यांच्या बहीण सौ. रूपाली मराठे, भारतीय युवा शक्तीचे मुख्य सल्लागार श्री. अंश देसाई, हिंदू राष्ट्र सेनेचे श्री. आदित्य देशमुख, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. विशाल पटनी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आदी मान्यवर आंदोलनाला उपस्थित होते.
आंदोलनातील सहभागी संघटना
     हिंदू गोवंश रक्षा समिती (तालुका वसई); भारतीय युवा शक्ती; वीर जिजामाता प्रतिष्ठान; हिंदु राष्ट्र सेना; रायगड संवर्धन प्रतिष्ठान; स्वराज्य युवा प्रतिष्ठान; हिंदु महासभा; हिंदु राष्ट्र युवा सेना; श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान; हिंदु राष्ट्र जनजागरण समिती; अजिंक्य मावळा प्रतिष्ठान; महाराणा प्रताप बटालियन; श्री शिवकार्य प्रतिष्ठान; स्वराज्य युवा प्रतिष्ठान; मातृभूमी प्रतिष्ठान; पू. आसारामबापू भक्ती परिवार; श्री बजरंग दल; ब्लड हेल्प हिंदुस्थान; राष्ट्रीय नवयुवक लोकसेवा संघ; दुर्गवीर प्रतिष्ठान; करणी सेना; राम सेना; नवतरुण मित्र मंडळ; राष्ट्रीय नवयुवक लोकसेवा संघ; विहिंप; अखिल भारतीय ब्राह्मण एकता मंच; वारकरी संप्रदाय; स्वराज्य हिंदु सेवा; हिंदु महासभा युवा इकाई; राष्ट्रवादी युवा वाहिनी (अयोध्या); हिंदु जनजागृती समिती; सनातन संस्था आणि अन्य अनेक समविचारी संघटना

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.