कल्याण/--- -

सनातन संस्था आध्यात्मिक संशोधन करून वैज्ञानिक दृष्टीकोनातून हिंदु धर्माचे महत्त्व पटवून देणारी संस्था आहे. संस्था हिंदु धर्माची बाजू खंबीरपणे मांडत असल्यामुळेच आज पुरोगामी खोटे आरोप करून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. सध्या अनेक राजकीय पक्षांतील घोटाळे उघड होत आहेत; पण त्यांच्यावर कधीच बंदीची मागणी केली जात नाही, उलट याच राजकीय संघटना स्वार्थासाठी आणि घोटाळे दाबून टाकण्यासाठी सनातन संस्थेवर खोटे आरोप करत आहेत. यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालणे पूर्ण अन्यायकारकच आहे, असे मत हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. आदित्य देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच सनातनवर होणार्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सर्व राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना सनातन संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही आश्वासन हिंदुत्ववादी संघटनांनी कल्याण येथील पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेला भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, स्वराज्य हिंदू सेनेचे अध्यक्ष श्री. सुशील तिवारी, श्री योग वेदांत सेवा समितीचे डोंबिवली शहर अध्यक्ष श्री. हरिश यादव, अधिवक्ता विवेक भावे उपस्थित होते.
💧 💧 मान्यवरांचे अभिप्राय 💧 💧
अधिवक्ता विवेक भावे म्हणाले, राष्ट्रद्रोही घटकांच्या दबावाला बळी पडून अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या साधकांना त्रास देण्याचे सत्र आरंभले आहे. ठोस पुरावा नसतांना सनातन संस्थेच्या साधकांना कारावासात ठेवले आहे.
श्री. सुशील तिवारी म्हणाले, वृत्तवाहिन्याही निर्दोष हिंदु नेते आणि संत यांच्या अटकेचे वृत्त हेतुपुरस्सर अतिरंजित करून दाखवतात; पण कालांतराने त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडल्यावर वृत्त देण्याचे टाळतात. हा दुहेरी मापदंड वापरणे म्हणजे हिंदु संघटनांवरील अन्यायाच आहे.
श्री. हरीश यादव म्हणाले की, हिंदु धर्मातील रुढी-परंपरा, धर्मशिक्षण आज लोक विसरत चालले आहेत. हेच धर्माचरण, धर्मशिक्षण देण्याचे कार्य सनातन संस्था प्रभावीपणे करत आहे. हेच निधर्मी लोकांना नको असल्यामुळे त्यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदीची मागणी होत आहे.

Post a Comment