बार्शी (जिल्हा सोलापूर) - सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात
विधान परिषदेत मी विषय मांडणारच होतो. मी तुमचाच आहे. मी तुमचा नसतो, तर मी
तुमच्या (सनातनच्या) कार्यक्रमांना आलोच नसतो. काळजी करू नका. सनातन
संस्थेवर बंदी येऊच शकत नाही, असे आश्वासन परांडा येथील विधान परिषदेतील
भाजपचे आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी दिले. सनातन संस्थेच्या वतीने
त्यांना संभाव्य बंदीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत
होते.
परांडा येथील ग्रामदैवत काळभैरवचे श्री. संजय महाराज पुजारी यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी सांगितले, मी मंदिर ट्रस्टच्या वतीने पत्र पाठवतोे आणि इतर मंदिर संस्थांनाही हा विषय सांगतो. करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार श्री. नारायण पाटील यांनाही कुर्डूवाडी येथे निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या साधकांसह हिंदुत्ववादी श्री. दादा तिटवे उपस्थित होते.

Post a Comment