चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
कार्तीक महिन्यानिमीत्य काकडा प्रभात फेरी महोत्सव समाप्ती आज शनिवारी होणार आहे. यानिमित्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा रामधून प्रभात फेरी चे आयोजन स्थानिक गुरूदेव सेवा सदगुरू मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही प्रभात फेरी आज सकाळी ८ ते २ या वेळेत स्थानिक मारोती मंदिरातुन काढण्यात येणार आहे. ही प्रभात फेरी मारोती मंदिरजवळुन निघुन सिनेमा चौक, जुना मोटार स्टैंड, अमरावती रोड, डांगरीपुरा, महादेवघाट, माळीपुरा येथुन भ्रमण करून पुन्हा मारोती मंदिरात विसर्जीत होणार आहे. यामध्ये भगवान राम लक्ष्मण व सिता यांच्या शोभायात्रेचा रथ राहील. तसेच भगवान श्रीकृष्ण, बळीराम दादा व हनुमंतराया यांचा सुध्दा रथ राहणार आहे. त्यानंतर २ ते ६ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सुरेश पेठे व इतर सदस्यांनी दिली. या प्रभातफेरीत टेंभुर्णी येथील पद्मावंती महिला भजन मंडळ, स्थानिक डांगरीपुरा येथील गुरूदेव सेवा मंडळ, महालक्ष्मी महिला भजन मंडळ, महादेवघाट येथील आसरा माता मंदिर मंडळ, श्री. गजानन महाराज मंडळ, खडकपुरा येथील युवक मंडळ, खडकपुरा येथील गुरूदेव सेवा मंडळ या दिंड्यांचा समावेश राहणार आहे. महादेव मंदिराजवळ दहीहांडीचा कार्यक्रमसुध्दा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सर्व भक्त मंडळींनी उपस्थीत राहुन शोभायात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे..
Post a Comment