अकोला - दक्षिण भारतातील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांची चौकशी सीबीआयकडे सोपवा आणि देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ आणि ‘पीस इंटरनॅशनल स्कूल’वर बंदी घाला, या विषयांवर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या कालावधीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नागरिकांनी स्वाक्षरी करून सहभाग दर्शवला. समितीचे श्री. धीरज राऊत यांनी स्थानिक दूरचित्रवाहिन्यांना मुलाखत दिली. श्री. श्यामसुंदर राजंदेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. आंदोलनात समितीचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक, तसेच धर्माभिमानी आणि वृतपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनानंतर उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
Monday, November 21, 2016
दक्षिण भारतातील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांची चौकशी सीबीआयकडे सोपवा - अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
Posted by vidarbha on 11:30:00 PM in अकोला | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment