अचलपूर/ श्री प्रमोद नैकेले
विद्युत बील पाहून धडकी भरते व हे बील कोणत्या वास्तूकरीता आहे हे पाहिले तर चक्कर आल्याशिवाय राहणार नाही असा अजब कारभार महावीतरणचा पाहून नक्कीच चिड येईल.
अचलपूर उपविभागातील सरमसपूर वितरण केंद्र क्रमांक दोन अंतर्गत येणा-या मंजूरपूरा मेहराबपूरा येथील शेख हसन शेख हुसेन ग्राहक क्रमांक 352630135773 यांना विद्युत मीटर न तपासता नादुरूस्त असल्याचे सांगून फ्लॅट रेटचे देयक देण्यात आले याबाबत त्यांचा मुलगा मो.नासीर जो एक हातमजूरी करणारा आहे याने अनेक वेळा वितरण केंद्र क्रमांक दोन सरमसपूरा व कार्यकारी अभियंता उपविभाग अचलपूर यांना तक्रारी केल्या तेंव्हा जुने मीटर तपासणी न करता नवीन मीटर बनवण्यात आले तेंव्हा जुने मीटर रीडींग 7554 होते 16 आक्टोंबर ला नवीन मीटर बनवण्यात आले ज्यामध्ये 4 डिसेंबर पर्यंत केवळ 56 एवढे युनीट वापरल्याचे रीडींग दाखवत आहे.
अर्थात एक ते दीड महिन्यात 56 ते 60 युनीट वापर असतांना महावीतरणने यांना माहे आँक्टोंबरचे देयक चक्क 31770 ₹ तर माहे नोव्हेंबर चे 32590 ₹ असे देयक देवून या गरीब कुटुंबावर आर्थिक संकट आणले आहे तसेच सहायक कार्यकारी अभियंता यांनी एवढे सर्व झाल्यावर जुने मीटर नादुरूस्त नसल्याचे कबूल करून हे देयक भरण्याची सुध्दा जबरदस्ती केली आहे सरमसपूरा वितरण केंद्राचे कार्यालयातून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येवुन या ग्राहकांची गोची करीत आहेत तक्रार नोंदवण्यास उपविभागीय कार्यालयात मो.नासीर जातात तर तेथील एक अधिकारी त्यांना धमकावून हाकलून देतात व म्हणतात की येथे यायचे नाही आला तर बघून घेईल अशी अरेरावी ग्राहकावर करून आर्थिक श मानसिक शोषन येथील अधिकारी ग्राहकांची करीत असल्याचे निवेदनात त्यांनी म्हटले आहे व हे निवेदन अधीक्षक अभियंता महावीतरण अमरावती यांना देण्यात आले आहे व हा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.
![]() |
| झोपडीवजा घर असलेल्या ग्राहकांला 32 हजाराचे विजबील |

Post a Comment