BREAKING NEWS

Tuesday, December 6, 2016

मायक्रोफायनांस कंपनीच्या सक्तीच्या वसुलीतून बचत गटांची सुटका व्हावी शिवसेना व चर्मकार संघटनेचे निवेदन.

अचलपूर  / श्री प्रमोद नैकेले :-


आज काल पैश्यांची गरज भागवण्यासाठी अनेक खाजगी फायनान्स कंपन्यांचा बाजार देशातील ग्रामीण भागात दिसत आहे.त्यांनी जनतेची लुट चालवली आहे यातून त्यांची सुटका करावी म्हणून शिवसेना व चर्मकार संघटनेने स्थानीक उपविभागीय अधिकारी महसुल व पोलीस यांना निवेदन देण्यात आले.
अचलपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मायक्रोफायनांस या खाजगी कंपनीच्या एंजटांनी बचत गटांच्या महिलांना पैश्यांची मदत म्हणून कर्ज रुपाने रक्कम वाटलेली आहे या पैश्यांची वसुली अतीशय निर्दयतेने केल्या जाते साप्ताहिक सभेत सर्व महिला सदस्यांनी उपस्थित राहून आपली वसुली व मदत घेणे हा एक नियम आहे गटातील एकही सदस्य गैरहजर असल्यास वसुली व मदत दिल्या जात नाही ऊलट सर्वावर दंडाच्या रुपाने भुर्दड आकारण्यात येतो तसेच या कंपनीतर्फे गटाला मोबाईल,सोलर लाईट,सायकल व टू व्हीलर सारख्या वस्तू जबरदस्तीने विक्री करण्याचे प्रयत्न करीत आहेत या वस्तू खरेदी विक्री केल्याशिवाय पुढील कर्ज अर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. अशा अटी मुळे महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. महिला आर्थिक व मानसिकरित्या खचून गेल्या आहेत या कंपनी बद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी सुचना व आदेश देवूनही त्याची अवहेलना केली जात आहे व ऊद्दटपणाची वागणूक महिलांना दिली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे या कंपन्यावीरूध्द फौजदारु गुन्हे दाखल करून महिला व बचतगटांना यांचे कचाट्यातून मुक्ती करावी असे शिवसेना विभाग प्रमुख व चर्मकार संघ तालुका अध्यक्ष मनोहर कोथळकर,विनय चतूर,प्रमोद भोंडे,नंदू काळे,पुष्पा कोथळकर,जोत्स्ना कोथळकर,सुमन चव्हाण,सुमन झोंबाळे व बगत गटांच्या महिलांची निवेदन देतांना उपस्थीत होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.