BREAKING NEWS

Tuesday, December 6, 2016

खराडी भागातील नागरिकांच्या समस्या संदर्भात बैठक

खराड़ी /तालुका हवेली / चंद्रकांत जगधने /-- 

खराडी चंदननगर परिसरातील खराडी हौसिंग सोशल वेलफियर असोसिएशन च्या वतीने खराडी चंदननगर परिसरातील अनेक नागरी समस्याचे निवारण करण्याकरिता  बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या .महापालिका उपायुक्त विजय दहिभाते, वसंत पाटील व त्याचे अधिकारी, कर्मचारी तचेस चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर हे बैठकीस उपस्थित  होते.
यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन आपल्या समस्या अधिकाऱ्यासमोर मांडल्या यामध्ये महापालिकाशी निगडीत खराडी भागातील इवॉन आयटी पार्क ते माउंडन ग्लोरी सोसायटी रोड व इतर रोड रुंदीकरण करणे रस्त्यावरती फुथपाट करणे तसेच उघड्यावरील कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावणे तसेच उत्तम नगर सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे खराडी भागातील सोसायटी व इतर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे रस्त्यावरील स्पीडब्रेकर शास्त्रीय पध्द्दतीने करणे त्यावरती रीप्लेक्तर  बसवणे अशा अनेक प्रश्नावर महापालिका अधिकाऱ्यांसोबत नागरिकाची चर्चा करण्यात आली. तसेच खराडी भागातील भागातील सोनसाखळी चोरी, रस्यावर अनधिकृतपणे पार्क केल्या जाणाऱ्या कंपन्याच्या गाड्या व कॅब, जेष्ठ नागरिकाची सुरक्षा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सोसायटी मध्ये CCTV कॅमेरे बसवणे, सोसायटी मध्ये पोलीस व्हीझीट करणे, या अनेक विषयावर पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केली. संबधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याबाबत नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी खराडी असोएशनचे पदाधिकारी सदस्य या भागातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.