BREAKING NEWS

Tuesday, December 6, 2016

सैनिकी शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मोईन खान / परभणी  : -


येथील संजीवनी शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश नाईकवाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काळे एम.ए.हे होते. यावेळी बोलतांना काळे एम.ए.यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला. एवढया महाकाय देशात लोकशाही नांदते त्याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आहे.  डॉ.आंबेडकरांनी संविधानात दिलेल्या अधिकारामुळे आज देशात समता नांदत आहे. सर्वांना समान संधी प्राप्त झाल्याने तळागाळातील गुणवत्ता धारकही मोठया पदावर जात आहेत. तसेच राज्यशासनामध्येही सर्वांना सर्व पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. काही तुरळक बाबी वगळता डॉ.आंबेडकरांनी सर्व समाजाकडे त्यांच्या उन्नतीसाठी बघितलेले स्वप्न आज पुर्ण होत आहे. अभिवादन दिनाच्या निमित्ताने सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या शालेय कामकाजा व्यतीरिक्त तीन तास वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे संकल्प केला. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुभाष वायगुडघे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.                        

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.