BREAKING NEWS

Thursday, December 15, 2016

विधानसभेनं शिक्षा दिल्यानं उपायुक्त श्री चंद्रकात गुडेवारांची स्वेच्छानिवृत्ती

पुणे /--

माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुनील देशमुख यांचं अवमानप्रकरण अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना अडचणीचं ठरण्याची
चिन्ह आहेत. कारण याप्रकरणी गुडेवारांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे नाराज चंद्रकांत गुडेवारांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. गुडेवार सध्या पुण्यात ग्रामीण विकास विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.
अमरावतीमध्ये आयुक्त असताना चंद्रकांत गुडेवार यांनी विधानसभा सदस्य (माजी राज्यमंत्री) डॉ. सुनील देशमुख यांचा अवमान केल्याच्या त्यांच्यावर आरोप करण्यात आल होता. याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याबाबतचा अहवाल आज सभागृहानं स्वीकारला. यात गुडेवार यांना सभागृहात बोलावून मुख्य सचिवांकडून समज देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यांना दिवसभर सभागृहात बसवून ठेवावे, तसंच त्यांना कोणत्याही कार्यकारी पदावर नियुक्त केलं जाऊ नये अशी शिफारस देखील या अहवालात करण्यात आली आहे. हा अहवाल स्वीकारण्यात आल्यानं गुडेवार स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.