BREAKING NEWS

Friday, December 16, 2016

सेंट्रल बँक अचलपूरचा अजब कारभार,निराधार जेष्ठ नागरिकांना चार वाजेपर्यंत ठेवले तात्कळत

प्रमोद नैकेले /-/अचलपूर:-


सेंट्रल बँक अचलपूर शाखेचा अजब कारभार आज कळस करून गेला.निराधार जेष्ठ नागरिकांना निराधार अनुदान वाटपाकरीता सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत उन्हात ताटकळत ठेवले.
सविस्तर वृत्त असे की १६ डिसेंबर ला निराधार अनुदान वाटपाचा कार्यक्रम स्थानीक सेंट्रल बँक शाखेने ठेवला त्याकरिता बँक कार्यालयासमोर एक सुचना लावण्यात आली की हे अनुदान गांधी पूल परिसरातील जगदंब विद्यालयाजवळील हनुमान मंदिरात वाटप होणार आहे.बँकेपासून अंदाजे एक किलोमीटर वर असलेल्या या हनुमान मंदिरात वाटप करण्यामागचे प्रयोजन काही समजले नाही पण आजकालच्या बँकेतील होत असलेल्या गर्दी मुळे हा निर्णय घेतला असेल तर बँक परिसरात अचलपूर नगरपालिकेच्या कार्यालयाची इमारतीमध्ये ही व्यवस्था होवू शकले असते मात्र बँक व्यवस्थापकांनी हे दिव्य काम करून निराधार नागरिकांना बँकेपासून दुर अनुदानाकरीता बोलावले याही पेक्षा विचीत्र प्रकार म्हणजे हे निराधार हनुमान मंदिर येथे सकाळी ११ वाजता पासून येवून बसले तेथे कुणीच बँक कर्मचारी अथवा अधिकारी नसल्याने त्यांनी नजीकच्या जगदंब विद्यालयात चौकशी केली मात्र याची पुसटशी कल्पना विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन बाबरेकर यांना  नव्हती म्हणून एक सामाजिक कार्य करायचे उद्देशाने त्यांनी बँक व्यवस्थापकांना दूरध्वनीवरून संपर्क साधून निराधार नागरिकांची समस्या मांडली तर त्यांनी मंदिरात नागरिकांना थांबवण्याचा सल्ला दिला व दोन वाजता वाटप होईल असे सुचवले दुपारी चार वाजेपर्यंत सुध्दा कुणीच बँक कर्मचारी तेथे न पोहचल्यामुळे निराश नागरिक पुन्हा विद्यालयात मुख्याध्यापक यांना भेटायला गेले तर मुख्याध्यापकांनी पुन्हां बँक व्यवस्थापकांसोबत संपर्क साधला असता त्यांनी मुख्याध्यापकांना त्या नागरिकांना बँकेत पाठविण्यास सांगितले कारण नगरपालिका व बँक येथील विद्युत पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात आले हा प्रकार म्हणजे एक मनस्ताप देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते शिवाय बँकेच्या भोंगळ कारभारामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापकांना आपले शाळेचे कार्य करण्यापेक्षा बँकेच्या चुकीच्या भानगडीत झालेल्या नसत्या मनस्तापास व जेष्ठ नागरिकांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासला जबाबदार अशा बँकेच्या अजब कारभार करणा-या अधिकारी व कर्मचारी वर्गावर कारवाई व्हावी अशी या नागरिकांची मागणी आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.