BREAKING NEWS

Monday, December 19, 2016

शोभाताई गावंडे घुईखेड सर्कलमधून भाजपातर्फे लढणार ? जि.प. निवडणुक रणधुमाळी

चांदुर रेल्वे- (शहेजाद  खान)-



जिल्हा परीषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सौ. शोभाताई बबनराव गावंडे ह्या भारतीय जनता पक्षाच्या तिकीटीवर घुईखेड सर्कलमधुन लढणार असल्याची चर्चा सगळीकडे ऐकावयास मिळत असल्याने असे झाल्यास खरोखर एक तुल्यबळ उमेदवार म्हणुन त्या समोर येउ शकतात.
चांदुर रेल्वे तालुक्यातील घुईखेड, आमला विश्वेश्वर व पळसखेड या तीन जि.प. सर्कलमधुन दोन सर्कलमध्ये महिलाराज राहणार असुन केवळ पळसखेड सर्कलमध्ये अनुसुचित जातीच्या पुरूष वर्गाकरीता राखीव आहे. घुईखेड सर्कल हा सर्वसामान्य महिलांसाठी राखीव आहे. यासर्कलमध्ये कॉंग्रेसतर्फे प्रविण घुईखेडकर यांची पत्नी, बंडुभाऊ देशमुख यांची पत्नी तसेच इतरही कार्यकर्ते पक्षाकडे तिकीटची मागणी करणार असल्याचे समजते. तर खरा प्रतिस्पर्धी असलेला पक्ष म्हणजे भाजपा या पक्षातर्फे आशुतोष गुल्हाणे यांची पत्नी, प्रशांत देशमुख यांची पत्नी, डॉ. हेमंत जाधव यांची पत्नी व बबनराव गावंडे यांची पत्नी सौ. शोभाताई गावंडे हे तिकीट मागण्यासाठी उत्सुक आहे. मात्र भाजपतर्फे सौ. शोभाताई गावंडे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.



             बबनराव गावंडे हे भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाप्रमुख असुन त्यांनी पंचायत समितीचे जनता दलातर्फे उपसभापतीपद सुध्दा भूषविले आहे. तर त्यांची पत्नी सौ. शोभाताई गावंडे ह्यांनीही जनता दलातर्फे जिल्हा परीषदेचे  महिला व बालकल्याण सभापतीपद सन २००५ ते २००७ या कालावधीत भुषविल्याने त्यांनी केवळ त्या वेळच्या त्यांच्या आमला विश्वेश्वर सर्कलमध्ये नव्हे तर संपुर्ण चांदुर रेल्वे तालुक्यातील अनेक नागरीकांना विविध योजनांचा लाभ दिलेला आहे. त्यांचे मुळ गाव राजना असुन त्यांचे पती बबवराव गावंडे यांचा तर संपुर्ण चांदुर रेल्वे तालुक्यात दांडगा परिचय आहे. यामुळे शोभाताईंनी भाजपाकडे घुईखेड सर्कलमधुन निवडणुक लढण्याची इच्छा प्रगट केली असुन पक्ष त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब तर करणार नाही ना ? म्हणुनच शोभाताई गावंडे ह्या भाजपाच्या घुईखेड सर्कलच्या उमेदवार म्हणुन निवडणुक लढविणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकावयास मिळत आहे व त्या कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या लढतीत लुल्यबळ उमेदवार म्हणुन समोर येऊ शकतात. मात्र पुढे पक्षाची भुमिका काय ठरते याकडे जनतेचे व भाजपा पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.