चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
भाजपला स्थानिक नेता निर्माण करण्याची गरज
जि.प. निवडणुकीत अरूण अडसडांची अग्नीपरीक्षा.
स्थानिक नगर परिषद अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. धामणगावात तर विजय प्राप्त झाला मात्र चांदुर रेल्वेत भाजपाला मोठा हादरा बसला आहे. कांग्रेसला सुद्धा निसटता विजय मिळाला. दोन्ही राष्ट्रीय पक्षाला मात्र अपक्ष नीलेश विश्वकर्मा ने चांगला घाम फोडत आपली भविष्याची बाजू मजबूत केली. यामध्ये राष्ट्रवादी चे गणेश रॉय यांचे राजकारण संपुष्टात आले. अरूण अडसड यांनी भाजप पक्षातील निष्ठावंत जुण्या कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली व एक अध्यक्ष गमावला. त्यातच निलेश विश्वकर्मा सारखा एक तगड़ा उमेदवार सुद्धा भाजपाने गमावला. ही चूक अरुण अडसड यांना मान्य करावी लागले. त्यातच चांदुर रेल्वे ची जनता अडसडांवर नाराज आहे हे स्पष्ट झाले आहे. भाजपाला निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अरूण अडसड चांदुर रेल्वेत भाजपाच नेतृत्व निर्माण होऊ देत नाही असा आरोप होत आहे. भाजपाचे मोठ मोठे कार्यकर्ते मागे पडत आहे. त्याचाच फायदा कांग्रेसला होत आहे. चांदुर रेल्वेमध्ये नेतृत्व निर्माण न होऊ दिल्याने याचा परिणाम खुद्द अडसडांवर सुद्धा होत आहे. कारण विधानसभेत पोहचण्यात त्यांना अपयश येत आहे. नरेंद्र मोदींची सभा झाल्या नंतर ही अरुण अडसड निवडून आले नाही याला काय म्हणावे लागेल ? मोदींमुळे नाही तर कार्यकर्त्यांमुळे नेता निर्माण होतो हे अडसडांना विसरता कामा नये. नेमका याचाच फायदा आमदार वीरेंद्र जगताप घेत आहे. भाजपाचे मोठया फळीचे तालुक्यातील अनेक निष्ठावंत नेते असून सुद्धा यांच्यावर अरूण अडसडांनी कधी जबाबदारी दिली नाही, विश्वास ठेवला नाही, कधी मोठे होऊ दिले नाही. मोठे होवू नये म्हणून त्यांच्यावर दुर्लक्ष करीत गेले. त्यामुळे चांगले कार्यकर्ते नाराज झाले. चांदुर रेल्वेत भाजपा मजबूत करायची असेल तर स्थानिक नेता निर्माण करावा लागेल.
आता पुढे जिल्हा परिषद निवडणूका आहे. ही सुद्धा अरूण अडसडांसाठी अग्नि परीक्षाच आहे. पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे. आता जिल्हा परीषदवर तीन ही जागा मिळवतील की चुकीने उमेदवारी देऊन कांग्रेसच्या दावनीला बांधतील ? असा धाक कार्यकर्त्यांत निर्माण झाला आहे. जिल्हापरीषदचे दोन सर्कल पळसखेड व आमला हे भाजपसाठी चांगले ठरू शकतात. दोन्ही एस.सी. साठी राखीव आहे. पळसखेड सर्कलमध्ये भाजप कोणता उमेदवार देणार याची वाट कांग्रेस बघत आहे. त्या नंतरच आपला तगड़ा उमेदवार देणार आहे. आमला सर्कल मध्ये ही तोच गेम खेळल्या जाणार आहे. घुईखेडमध्ये कांग्रेस पक्की आहे. आता बघायचे हेच आहे की, चांदुर रेल्वेत दोन्ही भाऊ आपआपला राजकारणी गेम खेळत दोन एस.सी. सर्कलमध्ये कोणते उमेदवार देऊन आपला विजय मिळवतील.....

Post a Comment