24 तासाच्या आत वरिल सर्व ठिकाणी गतिरोधक बसवा अन्यथा तीव्र आंदोलन चा ईशारा
आज तिवसा शहर युवक काँग्रेस , तिवसा शहर काँग्रेस , तिवसा न पं चे नगरसेवक यांच्या वतीने तिवसा येथील पिंगळाईं इंफ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेड तिवसा टोल नाका प्रशासन चे व्यवस्थापक प्रवीण वानखडे यांना तिवसा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पेट्रोल पंप चौक, पंचवटी चौक, सॉफ्ट कार्नर चौक येथे तातडीने गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवींण्याचे निवेदन देण्यात आले आणि याद्वारे तीव्र आंदोलन चा ईशारा देण्यात आला.
या महामार्गावर शालेय विद्यार्थी , अबाल वृद्ध , ग्रामीण भागातील शेतकरी, गुरे ढोरे , यांचे वर्दळीचे ठिकाण झ।ल्याने या ठिकाणी अनेक मोठे आणि किरकोळ अपघात सतत होत असतात.
या साठी तिवसा पोलीस निरीक्षक दिनेशजी शेळके यांनी सतत् या साठी पाठपुरावा केला आणि युवक काँग्रेस ने वेळोवेळी या बाबत आंदोलन केले आहे.
ही गंभीर मागणी नागरिकांची सुद्धा असल्याने आज आक्रमक पवित्रा घेत आज सदर निवेदन देण्यात आले.
यावेळी 24 तासाच्या आत वरिल सर्व ठिकाणी गतिरोधक बसविन्याचे आश्वासन व्यवस्थापक यांनी दिले.
यावेळी तिवसा न प उपाद्यक्ष वैभव् स वानखडे , शहर युवक काँग्रेस अद्यक्ष सागर राऊत , शहर काँग्रेस कमिटी अद्यक्ष अतुल देशमुख , नगरसेवक
मधुकर भगत , नरेंद्र विघ्ने , सचिन गोरे, आनंद शर्मा, पिंटू राऊत, स्वप्निल गंधे, योगेश वानखडे, गोकुल खाकसे , अंकुश देशमुख, राजु पुनसे, प्रशिक् शापामोहन, वैभव् काकडे, अंकुश बनसोड, प्रमोद बोराळकर , आशीष ताथोड़े , आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment