BREAKING NEWS

Friday, December 16, 2016

अयोध्येत राममंदिराची उभारणी करा ! - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांची लोकसभेत मागणी

वी देहली -


 हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले भगवान श्री रामचंद्रांचे अयोध्येत मंदिर व्हावे, अशी कोट्यवधी हिंदूंची मागणी आहे, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत नियम ३७७ नुसार १५ डिसेंबर या दिवशी केली. ६ डिसेंबरला भगवा संकल्प दिन, शौर्य दिन देशभरात साजरा केला गेला, तेव्हा सरकार राममंदिर उभारण्यासाठी पावले उचलील, अशी आशा होती; परंतु या संदर्भात सरकारने २ वर्षांत काहीच केलेे नसल्याचा खेद आहे, असे श्री. खैरे यांनी लोकसभेत मांडलेल्या सूचनेत म्हटले आहे. 
     श्री. खैरे यांनी सूचनेत पुढे म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने घोषणापत्राच्या माध्यमातून अयोध्येत राममंदिर उभारणार, असे आश्‍वासन दिले होते. आता पूर्ण बहुमताने सरकार निवडून आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर राखून राममंदिराची उभारणी जलदगतीने चालू व्हावी, यासाठी पावले उचलायला हवीत. राममंदिराच्या संदर्भातील प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी उच्चस्तरीय न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करून राममंदिराच्या संदर्भातील वादावरील सुनावणी ६० दिवसांच्या काळात पूर्ण होईल

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.